रामराजेंचे विरोधक एकवटू लागले ! 

नीरा-देवघर प्रकल्पाच्या पाणी वाटपात फलटण तालुक्‍यावर अन्याय झाला आहे. याला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकरच जबाबदार असल्याचा आरोप करत कॉंग्रेसने आंदोलनाची तयारी केली आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी फलटणला बैठक झाली. यावेळी रणजितसिंह निंबाळकर, ऍड. बाळासाहेब बागवान, शिवाजीराव फडतरे, समशेरसिंह निंबाळकर, दिगंबर आगवणे, तालुकाध्यक्ष जयकुमार शिंदे आदी उपस्थित होते.
रामराजेंचे विरोधक एकवटू लागले ! 
रामराजेंचे विरोधक एकवटू लागले ! 

सातारा : नीरा-देवघर प्रकल्पाच्या पाण्यासाठी फलटणचे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असताना विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना याप्रश्‍नी टार्गेट करण्यात येत आहे. खासदार उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे यासोबतच आता माजी खासदार हिंदूराव नाईक-निंबाळकरांकडूनही रामराजेंविरोधात आघाडी उघडली आहे. 

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्‍यातील नीरा देवघर प्रकल्पाव्दारे 11.09 टीएमसी पाणीसाठा निर्माण करून उजव्या कालव्यातून प्रवाही सिंचनाव्दारे वेनवडी, गावडेवाडी, शेखमिरेवाडी व वाघोशी या चार उपसा सिंचन योजना व 21 किलोमीटर लांबीच्या डाव्या कालव्याव्दारे भोर, खंडाळा, फलटण व माळशिरस या चार तालुक्‍यातील 43 हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे नियोजन होते. धरणात प्रतिवर्षी 13 टीएमसी पाणी साठत असून कालव्याची कामे संथ गतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होत नाही. पाणी असून त्याचा सिंचनासाठी वापर होत नसल्याचे वास्तव आहे. नियोजित वेळेत कालव्याची कामे झाली नसल्याने तीनही तालुके सिंचनापासून वंचित आहेत. पण लाभ क्षेत्रात नसूनही नीरा-देवघर धरणाचे पाणी नीरा डाव्या कालव्यातून बारामती व इंदापूरला सिंचनासाठी उपलब्ध केले जात असल्याने त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. 

यासंदर्भात हिंदूराव निंबाळकर म्हणाले, गेली 12 वर्षे हाच प्रकार सुरू आहे. खंडाळा, फलटण, माळशिरस या तालुक्‍यांना पाणी मिळणसाठी नीरा देवघर उजव्या कालव्याचे काम सुरू होणे गरजेचे आहे. नीरा देवघर प्रकल्प पूर्ण होऊन15 वर्षे झाली आहेत. ज्यांच्याकडे निर्णय करण्याची क्षमता होती, त्यांनी वेळकाढूपणा करून प्रकल्पास विलंब लावला. स्वतः:च्या मंत्रिपदासाठी तालुक्‍याच्या हक्काचे पाणी बारामती -इंदापूरला विकले. स्वार्थी राजकीय प्रतिनिधींनी सत्तेचा वापर करून गेल्या दहा ते 15 वर्षात नीरा डावा कालव्याव्दारे 60 टक्के पाणी बारामती इंदापूरकडे पळविले आहे. तर उजव्या कालव्यासाठी 40 टक्के देवून अन्यायकारक पाणी वाटपाचे धोरण अवलंबले आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com