ramraje | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...
हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

सभापती रामराजेंवर षड्‌यंत्राचा आरोप 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर
व साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची चौकशी करावी, या मागणीसाठी उदयनराजे समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. 

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर षड्‌यंत्र रचून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर
व साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची चौकशी करावी, या मागणीसाठी उदयनराजे समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. 

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 1999 मध्ये खासदार उदयनराजे भोसले यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे कटकारस्थान तत्कालीन
लोकप्रतिनिधी कै. अभयसिंहराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रचले होते. त्यावेळी सुमारे 22 महिन्यांपेक्षा अधिक काळ उदयनराजे यांना विनाकारण त्रास
सहन करावा लागला. मात्र, न्यायव्यवस्थेकडून याबाबत योग्य न्याय निवाडा झाला. आताही तसाच प्रकार झालेला आहे. खंडणीच्या गुन्ह्यात उदयनराजेंना अडकविण्याचे
षड्‌यंत्र रचून त्याव्दारे त्यांचे राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्‍यता आहे. विधान परिषदेचे सभापतिपदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीकडून अशा स्वरूपाची गंभीर घटना घडत आहे. 

या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी. उदयनराजेंना खोट्या खंडणीच्या गुन्ह्यात अडकविण्यात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार
शिवेंद्रसिंहराजे भोसले व इतरांचा मोठ्याप्रमाणात सहभाग आहे. याची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई तातडीने करावी, अशी मागणीही
करण्यात आली आहे. 

या निवेदनावर नगराध्यक्षा माधवी कदम, सुनील काटकर, राजू भोसले, रवी साळुंखे, किशोर शिंदे, भीमराव पाटील, सुहास राजेशिर्के, सुनील सावंत, ऍड. दत्तात्रेय बनकर,
यशवंत ढाणे यांच्यासह सुमारे शंभर ते दीडशे खासदार समर्थकांच्या सह्या आहेत. 

संबंधित लेख