ramoshi community demand st quota | Sarkarnama

रामोशी समाजाचा ST त समावेश करा; फलटणमध्ये शनिवारी मोर्चा 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

जय मल्हार क्रांती संघटनेने बेरड रामोशी समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी शनिवारी (ता.11) सकाळी 11 वाजता फलटण तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

फलटण : जय मल्हार क्रांती संघटनेने बेरड रामोशी समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी शनिवारी (ता.11) सकाळी 11 वाजता फलटण तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. 

बेरड व रामोशी समाजाला आजपर्यंत शासकीय सोयी-सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. हा समाज आजही मागासलेला आहे. 50 ते 60 लाख लोकसंख्या असलेल्या या समाजाला विमुक्त जातीमध्ये समाविष्ट केले आहे. त्यामध्ये तत्सम 14 जाती समाविष्ट आहेत. त्यामुळे रामोशी समाजाला आरक्षणाचा फायदा मिळत नाही. बेरड, बेडर व रामोशी या सर्व जाती एकच आहेत. इतर राज्यांमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गात त्यांचा समावेश आहे. अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयांत निवेदने देण्यात आली आहेत. येत्या 16 ऑगस्ट तारखेपासून कोल्हापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. 

संबंधित लेख