ramnath kovind shirdi darshan | Sarkarnama

साईबाबांच्या शिर्डीचे राष्ट्रपतींकडून कौतुक 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

नगर ः छोटी शहरे विमानसेवेने जोडल्याने नागरिकांना सुविधा मिळतात. त्यामुळे देशाच्या विकासाला चालना मिळेल. शिर्डीतील काम चांगले आहे, त्यांनी स्वच्छतेसाठी अधिक लक्ष द्यावे, असे सांगून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनाने समाधान व्यक्त केले. 

श्री साईबाबा समाधी शताब्दी व शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उदघाटनानिमित्त कोविंद शिर्डीला आले होते. तेथे आयोजित सत्कार समारंभात त्यांनी शिर्डीतील साई संस्थानचे कौतुक केले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार, खासदार उपस्थित होते. 
कोविंद यांनी शिर्डीच्या विकासासाठी ही विमान सेवा अधिक फायदेशीर होऊ शकेल. साईबाबांच्या भक्तांना आता विमानसेवेमुळे कमी वेळेत दर्शन घेता येईल. ही भूमी महाराष्ट्राच्या धार्मिक वैभवात भर घालणारी आहे, असे सांगितले. 

धावपट्टीची लांबी वाढविणार ः फडणवीस 
शिर्डी विमानतळाची दावपट्टी 2500 वरून 3200 लांबीची करण्यात येईल, असे जाहीर केले. शिर्डी विमानतळ रे राज्य शासनाने विकसित केलेले आणि चालविण्यास घेतलेले देशातील पहिले विमानतळ आहे, असे सांगितले. शिर्डी विमानतळासाठी पहिल्या टप्प्यात 800 कोटींचा खर्च झाला असून, हा आराखडा 3200 कोटींचा आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील कामांना सुरूवात होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

संबंधित लेख