rammandir and shivsena | Sarkarnama

चंद्रकांत खैरे यांच्याकडून राममंदिरासाठी चांदीची विट

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

अयोध्या : अयोध्येत राममल्लाच्या दर्शनासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल झाले आहेत. या दौऱ्याची महत्वाची जाबाबदारी पार पाडणारे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी राममंदिरासाठी चांदीची विट अर्पण केली. या दौऱ्यासाठी ते व औरंगाबादचे अनेक शिवसैनिक इथे कालापासून दाखल झाले आहेत. 

अयोध्येमध्ये 1992 मध्ये झालेल्या आंदोलनात शिवसेना सहभागी झाली होती. त्यावेळी अनेक शिवसैनिक वादग्रस्त ढाचा पाडण्यातही सहभागी होते. त्यावेळच्या आंदोलनासंदर्भात खासदार खैरे यांना नुकतीच सीबीआय न्यायालयाने समन्स बजावले आहे. येत्या 28 नोव्हेंबरला त्यांना न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे. 
 
संबंधित लेख