ramesh kadam inquiry mumbai | Sarkarnama

रमेश कदमांच्या शाही पाहुणचाराची चौकशी अजूनही अर्धवटच 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 27 ऑगस्ट 2017

मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी कारागृहात असलेले रमेश कदम यांना 19 जुलै रोजी बीड येथे पोलिसांकडून शाही पाहुणचार करण्यात आला होता, त्यासाठीची चौकशी अद्यापही अर्धवट असल्याची कबुली सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज मंत्रालयात दिली. 

ज्या अधिकाऱ्याने बीड येथे रमेश कदम यांना शाही पाहुणचार आणि त्यासाठीची सोय केली, त्यांना आम्ही नोटीस बजावली असून त्यांचा अजून कोणताही खुलासा आला नाही. तो खुलासा आल्यानंतर या शाही पाहुणचारविषयी कारवाई कोणती करायची यावर निर्णय घेतला जाईल अशी माहितीही कांबळे यांनी दिली. 

19 जुलैच्या दरम्यान कदम यांना बीड येथे महामंडळाच्याच आर्थिक घोटाळ्याप्रकरणी चौकशीला आणण्यात आले होते. त्यावेळी कदम यांना पोलीसांकडून त्यांना स्थानिक पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये अथवा जिल्हा कारागृहांमध्ये ठेवण्याऐवजी पोलिसांनी कदम यांना शाही पाहुणचार करत त्यांची बीड येथील शासकीय विश्रामगृहात राहण्याची सोय केली होती. ही बाब समोर आल्यानंतर राज्यात हे प्रकरण बरेच गाजले होते, त्यामुळे सरकारने याविषयी चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते.  
 
संबंधित लेख