शिवसेना अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी ठाम; रामदास कदमांनी चंद्रकांतदादांना सुनावले

शिवसेना अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी ठाम; रामदास कदमांनी चंद्रकांतदादांना सुनावले

मुंबई : पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेला अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत झाल्याचा दावा केला आहे. दोन्ही पक्षांना अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मिळणार असून चंद्रकांत पाटील यांनी विपर्यास करू नये, असे सुनावले आहे.

दोन्ही पक्षांनी युतीच्या आणाभाका घेतल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदावरून ताणाताणी सुरू झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचे ठरले नसल्याचे काल स्पष्ट केले होते. त्यावरून कदम यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

मुंबईत आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी चंद्रकांत  पाटील यांना हा फाॅर्म्यूला  मान्य नसेल तर त्यांनी युती तोडावी, असे आव्हान दिले. एकमेकांचे आमदार पाडायचे धंदे करू नयेत, असाही इशारा त्यांनी दिला. 

युती करताना प्रमुख अट ही नाणार प्रकल्प रद्द करण्याची होती. त्यानुसार नाणार प्रकल्प रद्द झालेला आहे. नाणारची सर्व प्रक्रिया आचारसंहिता लागण्याची आधी रद्द होईल, असेही त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com