ramdas kadam shivsena | Sarkarnama

मध्यावधी निवडणुकीसाठी शिवसेना कधीही सज्ज - रामदास कदम

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 जून 2017

नांदेड : आजपर्यंत शिवसेना सत्तेत आहे ते केवळ शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच. पेरणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात लेखी आश्वासन दिले होते. परंतु त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. म्हणून काल झालेल्या बैठकीवर शिवसेनेने बहिष्कार टाकला. असे सांगून मध्यावधी निवडणुकीसाठी शिवसेना कधीही सज्ज असल्याचा इशारा त्यांनी भाजपला दिला.

शासकीय विश्राम गृहात शुक्रवारी पर्यावरण मंत्री रामदास कदम पत्रकार परिषदेत बोलत होते. श्री. कदम यांच्या नांदेडच्या अचानक दौऱ्याचे कारण विचारले असता ते म्हणाले, शिवसेनेच्यावतीने शिवसंपर्क अभियान राबविले जात असून, पक्षाला अपेक्षित असलेले काम जिल्ह्यात सुरू आहे की नाही. याची पहाणी करण्यासाठी आजपासून महाराष्ट्र आणि खानदेशच्या दौऱ्यावर असल्याचे त्यांनी सांगितले. 

मध्यावधी निवडणुकीबद्दल पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले "मी जोशी नाही; की ज्योतिषी नाही त्यामुळे मध्यावधी कधी लागणार हे सांगता येणार नाही. परंतु राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची हेळसांड होत असेल आणि सरकार शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत नसेल तर, शिवसेना सत्तेला कधीही लाथ मारू शकते असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. 

कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सध्या नौटंकी आंदोलने सुरू आहेत. दिवसा शेतकऱ्यांना भेटी देऊन शेतकऱ्यांना एक सांगायचे आणि दुसरीकडे आम्ही तुमच्या सोबत आहो म्हणून पंतप्रधानांच्या कानात जाऊन बोलायचे अशांना आंदोलन करण्याचा नैतिक अधिकारच नाही. म्हणून नाव न घेता त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

शिवसेना सत्तेतून कधी एकदा बाहेर पडते अन आम्ही सरकार पक्षात जातो. असे त्यांना वाटत असून, शिवसेना सत्तेतून बाहेर पडावे याचीच ते वाट पहात आहेत आणि दुसऱ्याची थट्टा उडवत आहेत. परंतू आम्हाला सत्तेतून कधी बाहेर पडायचे यासाठी दुसऱ्यांच्या सल्ल्याची गरज नाही. सत्तेतून बाहेर पडण्यासाठी पक्षश्रेष्ठी योग्य वेळी निर्णय घेतील असे ते म्हणाले.

या वेळी शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील, आमदार सुभाष साबणे, आमदार नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख, प्रकाश मारावार यांची उपस्थिती होती. 

संबंधित लेख