ramdas kadam mumbai news | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

विरोधकच शिल्लक नाहीत, त्यामुळे आम्हीच विरोधक : रामदास कदम 

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

मुंबई : राज्यात आज कोणी विरोधकच शिल्लक नाहीत. त्यामुळेच सत्तेत असूनही आम्हाला विरोधकांची भूमिका पार पाडावी लागत आहे याकडे लक्ष वेधत शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली. 

मुंबई : राज्यात आज कोणी विरोधकच शिल्लक नाहीत. त्यामुळेच सत्तेत असूनही आम्हाला विरोधकांची भूमिका पार पाडावी लागत आहे याकडे लक्ष वेधत शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली. 

दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, एकनाथ शिंदे, रवींद्र वायकर, दीपक सावंत, दादा भुसे या शिवसेना मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत शिवसेनेने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी केली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले, "" सरकारने सहा महिन्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. मात्र,पदरात काहीच पडले नाही. कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करीत आहेत. दिवाळीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. दसऱ्यापर्यंत कर्जमुक्ती झाली पाहिजे यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांना देऊ असे आश्वासन त्यांनी दिले आहे.'' 

कर्जमुक्तीच्या घोषणेने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. याची जबाबदारी कोण घेणार असे विचारले असता कदम म्हणाले, "" राज्याचे मुख्य सचिव व मुख्यमंत्र्यांवर का गुन्हा दाखल करू नये अशी मागणी मी विरोधी पक्षनेता असताना केली होती. नैसर्गिक आपत्तीमुळे नाईलाजाने घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे बॅंकाचा तकादा लागतो. यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या. म्हणूनच कर्जमुक्तीबाबत मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतील आणि आत्महत्या थांबतील अशी आम्ही अपेक्षा करतो. शेतकऱ्यांवर जे गुन्हे दाखल झालेत ते गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे.'' 

दिवाकर रावते म्हणाले, " खरिपाचा हंगाम गेल्यामुळे रब्बीच्या हंगामाला शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे असे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितले. दसऱ्याच्या आत कर्जमाफी द्यावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे. दिवाळी दसऱ्यादरम्यान कर्जमाफीची रक्कम देण्याचे आश्वासन दिले. कर्जमाफीची रक्कम न मिळाल्याने खरीप हंगाम वाया गेला. आज शिवसेनेने जे मोर्चे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढले त्यामागे कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी यासाठी शिवसेना आग्रही आहे.''  

 
 

संबंधित लेख