ramdas kadam, mumbai | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

"" शिवसेना- भाजप युती ही  भारतीय राजकाणातील विक्रम '' 

सुचिता रहाटे 
गुरुवार, 13 जुलै 2017

मुंबई : शिवसेना आणि भाजपची मैत्री ही भारतीय राजकारणातील एक विक्रम आहे. या राजकीय मैत्रीला दृष्ट लावण्याचा प्रयत्न नतद्रष्ट प्रवृत्तीकडून होत आहे. तरीही शिवसेना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनाच मतदान करणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज सरकारनामाशी बोलताना दिली. 

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद येत्या शनिवारी मुंबईत येत असून शिवसेनेकडून कोविंद यांचे स्वागत करण्यात येणार आहे. कोविंद यांची मातोश्री भेट होणार की नाही याविषयी बातम्या प्रसिद्ध होत आहेत. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा त्यांनाच आहे. शिवसेनेचे सर्व मतदार त्यांनाच मतदान करणार, अशी ग्वाहीही कदम यांनी यावेळी दिली. 

शिवसेना आणि भाजप हे दोन्ही वेगळे पक्ष असल्याने काही मतभेद असणे साहजिक आहे. उलटपक्षी हे जीवंतपणाचे लक्षण आहे. पण आमच्यामध्ये मनभेद मात्र अजिबात नसल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्या सरकारचे प्रमुख असून त्यांचे आणि माझे व आमच्या शिवसेनेचे संबंध चांगले आहेत असेही कदम म्हणाले. दरम्यान, शिवसेनेचा पाठिंबा असलेला उमेदवारच भारताचा राष्ट्रपती होतो हे गेल्या काही निवडणुकांवरून दिसून येईल याकडे ही कदम यांनी शेवटी लक्ष वेधले. 
 
संबंधित लेख