ramdas kadam and nanded | Sarkarnama

चव्हाण यांच्याबद्दलच्या ठरावाच्या मुद्यावरून धुमश्‍चक्री, रामदास कदम यांच्या भूमिकेवरून वादंग

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

नांदेड : पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेक विषयावर वादळी चर्चा झाली. बैठकीदरम्यान खासदार अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसाचा ठराव घेण्यास पालकमंत्री रामदास कदम यांनी नकार दिला. याबाबत आग्रह धरणाऱ्या कॉंग्रेस सदस्यांना पालकमंत्र्यांनी सदस्यत्व रद्द करण्याचा दम दिला. यानंतर पालकमंत्र्यांनी विषयसूची शिवाय इतर विषयावर चर्चा करू दिली नाही. 

उमरी नगरपालिकेच्या सदस्या दीपाली मामीडवार यांनी तालुक्‍यातील पाच गावे तेलंगणा राज्यात जाण्याच्या तयारीत असलेल्याची माहिती दिली. पण त्यांच्यावर पालकमंत्री भडकले. "अशी भाषा करू नका. हा महाराष्ट्राचा अपमान आहे", असे म्हणत तुमचे सदस्यत्व रद्द करु,असा इशारा त्यांनी दिला. धर्माबादप्रमाणे सीमावर्ती भागातील इतर तालुक्‍यांना निधी देण्याची मागणी काही सदस्यांनी केली. यावर पालकमंत्री कदम यांनी धर्माबादचा निधीही रद्द करु असा दम दिला. 

यानंतर आमदार विक्रम काळे यांनी अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त ठराव माडण्याचा प्रयत्न करताच पालकमंत्र्यांनी सभा संपल्याचे जाहीर केले. यावर कॉंग्रेस सदस्यांनी आक्रमक होऊन सभा सुरु ठेवू, अशी भुमिका घेतली. यावरून सभा घेवून दाखवा, असा दम पालकमंत्र्यांनी भरला. यानंतर सभागृहाच्या बाहेर पालकमंत्र्यांच्या विरोधात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने वातावरण तापले. यावेळी पालकमंत्री तसेच कॉंग्रेस आमदाराचा गोंधळ उडाला. एकमेकांविरुद्ध घोषणा बाजीमुळे वातावरण तणावपूर्ण झाले. आमदार अमर राजूरकर आणि आमदार हेमंत पाटील यांच्यात बाचाबाची झाली. एकंदरीत जिल्हा नियोजन समितीची सभा अर्ध्यावर गुंडाळल्याने अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. 

संबंधित लेख