ramdas kadam | Sarkarnama

रामदास कदम यांच्या गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी

ब्रह्मा चट्टे
गुरुवार, 25 मे 2017

मुंबई : पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आमदार संजय कदम यांनी रामदास कदम यांची दंडेलशाही रोखण्याची मागणी केली आहे. 

मुंबई : पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आमदार संजय कदम यांनी रामदास कदम यांची दंडेलशाही रोखण्याची मागणी केली आहे. 

आमदार संजय कदम यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोली, मंडणगड, खेड या मतदारसंघात आपल्या पदाचा गैरवापर करत स्वतःच्या आंबा बागेला जिल्हा परिषदेच्या 5 कोटी निधीतून संरक्षक भिंत घातल्याचा आरोप केला आहे. 
रामदास कदम यांनी स्वतःच्या घराकडे जाणाऱ्या दीड किलो मीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूनी जिल्हा परिषदेच्या 3 कोटी निधीतून संरक्षक भिंत बांधली असल्याची तक्रारही त्यांनी या पत्रात केली आहे.

पर्यटनाच्या नावाखाली रामदास कदम यांनी मूर्तीं खरेदी करण्याचे 35 लाखाचे टेंडर आपल्याच शिवतेज आरोग्य संस्थेतील संचालकाला मिळवून दिल्याचा आरोपही श्री. कदम यांनी केला आहे. आपल्या पदाचा गैरवापर करत मंत्री कदम यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकत निधीचा गैरवापर केल्याची तक्रार करून या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी श्री. कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

दरम्यान, यापूर्वी दापोली, मंडणगड, खेड या तालुक्‍यातील जलयुक्त शिवार योजनेच्य कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत आमदार संजय कदम यांना दोषी ठरवत रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली होती. आता रामदास कदम यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याची तक्रार करत आमदार संजय कदम यांनी रामदास कदम यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामुळे दोन कदमांच्या एकमेकांची चौकशी करण्याच्या मागणीला मुख्यमंत्री कसा प्रतिसाद देतात हे पहाणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

संबंधित लेख