ramdas kadam | Sarkarnama

रामदास कदम यांच्या बंगल्यावरून दहा लाखांच्या खंडणीचा फोन ?

संजीव भागवत : सरकारनामा
सोमवार, 8 मे 2017

मुंबई : आपल्या बेताल वक्‍तव्यावरून नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडणारे पर्यावरण मंत्री रामदास कदम आता एका नव्या वादात सापडले आहेत. काल (शुक्रवारी) त्यांच्या "शिवगीरी' या बंगल्यातून वाळू उपसा ठेकेदाराला थेट दहा लाखांच्या खंडणीचा फोन गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. मात्र या प्रकरणाची कुठेही वाच्यता होऊ नये यासाठी स्वतः कदम यांनीच खबरदारी घेतली असल्याने यासंदर्भात चौकशीला गेलेल्या मलबार हिल पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनीही आपल्या तोंडावर बोट ठेवले आहे. 

दुसरीकडे या खंडणीच्या प्रकरणाविषयीची माहिती ही पोलिस आयुक्‍त कार्यालयाकडेच विचारावी अशी विनवणी ही स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याकडून करण्यात आल्याने या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे. कदम यांच्या शिवगीरी या बंगल्यावरून 10 लाखांच्या खंडणीसाठी एका वाळू उपसा करणाऱ्या ठेकेदाराला फोन करण्यात आला असून त्या फोनचे रेकॉर्ड झाल्याने याविषयी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. यात कदम यांच्या बंगल्यावर राहणाऱ्या त्यांच्या पीएपासून ते इतर अधिकाऱ्यांवरही संशय व्यक्‍त केला जात असला तरी 10 लाखांच्या खंडणीसाठी नेमका फोन केला याविषयीचा छडा लागला नसल्याने स्वतः कदमही संतप्त झाले असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे पोलिसांच्या चौकशीनंतर स्वतः कदम यांनी अनेकांना फैलावर घेत त्यांची झाडाझडती घेतली असली तरी फोन करणारा अधिकारी की, पीए असा प्रश्‍न मात्र अद्याप सुटला नसल्याने याविषयी रामदास कदम हे या खंडणीच्या प्रकरणावरून अडचणीत सापडण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे खंडणीच्या या गंभीर प्रकरणावरून विरोधकांना कदम यांची कोंडी करण्याची आयती संधी मिळाली असल्याचेही बोलले जात आहे.  

संबंधित लेख