ramdas kadam | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातूनच आरक्षण : मुख्यमंत्री
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

कर्जमुक्तीबाबत शिवसेना अधिक आक्रमक होणार - रामदास कदम

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 25 एप्रिल 2017

औरंगाबाद :  शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा प्रश्‍न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. त्यासाठी दिल्लीत शिवसेनेचे खासदार व विधानसभेत आमदार आक्रमकपणे आवाज उठवत आहेत. शिवसैनिक देखील रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत कर्जमाफी संदर्भात लेखी आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे खरीप हंगामापर्यंत वाट पाहणार आहोत. कर्जमुक्तीच्या प्रश्‍नावर शिवसेना आगामी काळात अधिक आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राज्याचे पर्यावरण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी दिला. औरंगाबादेत आयोजित खरीप आढावा बैठकीत ते बोलताना दिला. 

आढावा बैठकीच्या निमित्ताने रामदास कदम यांनी कर्जमुक्ती, तूर खरेदी, शेतकऱ्यांना मदत यासह महापालिकेच्या विविध प्रश्‍नावर आपली भूमिका मांडली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्‍य नसल्याचे विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावर प्रश्‍न विचारला असता मी फक्त मुख्यमंत्र्यांना ओळखतो, चंद्रकांत पाटील कोण आहेत मला माहीत नाही असा टोला कदम यांनी लगावला. राज्यात तूर खरेदीमुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीवर भाष्य करताना तूर खरेदीच्या बाबतीत सरकारचे नियोजन चुकल्याची टीका व कबुली त्यांनी दिली. शेतकऱ्यांचे सातबारे आणून त्यांच्या नावावर व्यापाऱ्यांकडून खरेदी केंद्रावर तूर विकली जात असल्याचा आरोप देखील रामदास कदम यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांना शेततळे घेण्यासाठी मोफत पोकलेन उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
बाळासाहेब ठाकरे स्मृती वनासाठी 20 कोटी 
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी औरंगाबादेत उभारण्यात येणाऱ्या स्मृती वनासाठी 20 कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केल्याची माहिती कदम यांनी दिली. यापूर्वी स्मृती वनासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. स्मृतीवनाचे काम लवकरच सुरू होईल असे त्यांनी सांगितले. 

संबंधित लेख