ramdas futane about atalbihari vajpeyi | Sarkarnama

जेव्हा वाजपेयी रामदास फुटाणेंच्या 'कटपीस'ला दाद देतात! 

संपत मोरे 
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

दिवंगत नेते, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलची एक आठवण. 

सुप्रसिद्ध कवी रामदास फुटाणे यांनी सांगितलेली एक आठवण. मी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचा सदस्य होतो.त्यावेळी मुंबईत भाजपाचे अधिवेशन होते. ते 1988 साल होते.या अधिवेशनात वेगवेगळ्या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

त्याचाच एक भाग म्हणून हिंदी कवी संमेलनाचे होते. या कवीसंमेलनात मी सहभागी व्हावे व्हावे असा आग्रह वाजपेयी यांचे निकटवर्तीय, पत्रकार सुधीर नांदगावकर यांनी धरला. मी कॉंग्रेसचा सदस्य असल्याने येईल का नाही, असे त्याना वाटत होते पण अटलजी स्वतः ऐकणार होते त्यामुळे मी आनंदाने निमंत्रण स्विकारले. यावेळी अटलजींनी कटपीस व ऑन तू ले या कवितांना खूप दाद दिली. कवी संमेलन पार पडल्यावर नांदगावकरांनी माझी वाजपेयींशी ओळख करून दिली. त्यावेळी मी त्यांना कॉंग्रेस पक्षाचा आहे असे सांगितले.मग मी त्यांच्या पाया पडलो. त्यांना आशीर्वाद मागितले. 

मी आजपर्यंत राजकारणातील दोनच व्यक्तींच्या पाया पडलो. एक यशवंतरावजी चव्हाण व दुसरे अटलबिहारी वाजपेयी. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख