ramdas athwale`s formula for power sharing | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

भाजप-सेनेने प्रत्येकी दोन तर; आरपीआयला एक वर्ष मुख्यमंत्रिपद : आठवले यांचा अनोखा फाॅर्म्यूला 

राजेश प्रायकर
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

नागपूर : भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती होणार असून दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्रीपद दोन-दोन वर्षे वाटून घ्यावे. उरलेल्या एक वर्षासाठी रिपब्लिकन पक्षाला मुख्यमंत्रीपद सोडावे, असा नवा फॉर्म्युला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

नागपूर : भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती होणार असून दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्रीपद दोन-दोन वर्षे वाटून घ्यावे. उरलेल्या एक वर्षासाठी रिपब्लिकन पक्षाला मुख्यमंत्रीपद सोडावे, असा नवा फॉर्म्युला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

 
काही कार्यक्रमासाठी नागपुरात आलेल्या रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप-सेना युती होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजप व सेनेने एकत्र लढणे आवश्यक आहे. मुख्यमंत्रिपदाबद्दल वाद आहे. यातून मार्ग काढण्यासाठी अडीच-अडीच वर्षांचा अवधी दोन्ही पक्षांनी वाटून घ्यावा. यात दोन्ही पक्षांनी सहा महिने मुख्यमंत्रीपद रिपब्लिकन पक्षाला द्यावे, असा आपला फॉर्म्युला असल्याचे आठवले यांनी सांगितले.

या फॉर्म्युल्यावर भाजप-सेनेतील नेत्यांशी चर्चा झालेली नाही परंतु भाजप-सेनेची युती भक्कम करण्यासाठी हा आपला फॉर्म्युला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल बोलताना ते म्हणाले, विस्तारावरूनही काही तोडगा निघत नाही. दोन्ही पक्षांमध्ये कुणाला मंत्रिपद द्यावे, याबद्दल एकमत होत नाही. या स्थितीत ही मंत्रिपदे रिपब्लिकन पक्षाला देण्यात यावी, यामुळे कोणताही वाद निर्माण होणार नाही.``

 
विधानसभा निवडणुकीत भाजपचीच सरशी 

पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचीच सरशी होईल, असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले, मध्यप्रदेश, छत्तीसगड व मिझोराममध्ये भाजपची सत्ता येणार आहे. राजस्थानमध्ये काट्याची टक्कर आहे व तेलंगणामध्येही भाजपची सत्ता येण्याची शक्‍यता असल्याचे भाकीत आठवले यांनी केले

संबंधित लेख