ramdas athwale said congress is not long from me | Sarkarnama

भाजपसोबत असलो तरी कॉंग्रेस आपल्यापासून दुरावलेली नाही : रामदास आठवले 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालावर राज्यातील आघाड्यांचे सूत जुळणार आहे. भाजपच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनीदेखील हवेचा अंदाज घेऊनच आघाडीचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर करत भाजपच्या आघाडीत बिघाड करण्याचे सूतोवाच केले आहेत. भाजपसोबत गेलो असलो तरी कॉंग्रेस आपल्याला दुरावलेली नसल्याचे सांगत त्यांनी पर्याय मोकळे असल्याचे स्पष्ट केले. 

मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना रामदास आठवलेंसोबत कॉंग्रेस आमदार नसीम खान एका व्यासपीठावर होते. त्या वेळी आपल्या भाषणात रामदास आठवले यांनी फटकेबाजी करत कॉंग्रेसबरोबरच्या आपल्या जुन्या संबंधांना उजाळा दिला. 

आठवले म्हणाले, की दहा पंधरा वर्षे कॉंग्रेससोबत होतो. आता भाजप जोपर्यंत सत्तेत आहेत तोपर्यंत त्यांच्याबरोबर राहणार. आघाडीबाबत मात्र आपण हवेचा अंदाज घेऊन त्यानुसार निर्णय घेऊ. आपल्याला मंत्रिपदाची हाव नसल्याची पुस्ती ही त्यांनी या वेळी जोडली. याआधीदेखील आठवले यांनी भाजपच्या विसंगत भूमिका घेतल्या आहेत. राम मंदिराच्या जागी बुद्धविहार बांधण्याची मागणी त्यांनी केली होती. 

मुलाच्या खांद्यावर वारसा 
राजकीय वारसा मुलांच्या खांद्यावर ठेवण्याची परंपरा रामदास आठवले यांनीदेखील सुरू ठेवली आहे. आठवलेंचे चिरंजीव जीत आठवले आरपीआयच्या राष्ट्रीय बाल आघाडीचे अध्यक्ष असल्याचे आठवले यांनी जाहीर केले आहे. तसेच काल जीत आठवलेचा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदारपणे साजरा करत आठवलेंनी मुलाची राजकीय प्रवेशासाठीची कवाडे उघडल्याचे समजले जात आहे. 

संबंधित लेख