ramdas athwale applose bout free petrol | Sarkarnama

टीकेची झोड उठताच आठवलेंना उपरती, म्हणाले, "चुकलो !

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 सप्टेंबर 2018

मुंबई : "इंधन दरवाढीचा मला त्रास नाही...मी मंत्री असल्याने पेट्रोल फुकट मिळते" असे वादग्रस्त विधान करणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर टिकेची चौफेर झोड उठताच त्यांना चोवीस तासांनी म्हणे उपरती आली. आता आठवलेसाहेब म्हणत आहे, की सर्व सामान्य जनतेच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. 

पेट्रोल डिझेलची दरवाढ रद्द झाली पाहिजे असे स्पष्ट करून ते म्हणाले, "" वाढते इंधन दर रोखले पाहिजेत ही सामान्य जनतेची भावना योग्य असून इंधन दरवाढ कमी करण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. इंधन दरवाढ आणि सर्व प्रश्नांवर आपण नेहमी जनतेच्या भावना समजून घेतल्या आहेत त्यामुळे इंधन दरवाढ बद्दल बोलताना कुणाच्याही भावना दुखाविण्याचा हेतू नव्हता. आपण नेहमी जनभावनेप्रति संवेदनशील आहोत. त्यामुळे माझ्या वक्तव्यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.'' 

आठवले यांनी काल केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत होते. प्रसार माध्यमातून टीका होऊ लागताच त्यांनी आज अधिकृत खुलासा करून दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, की इंधन दरवाढीचा रिपब्लिकन पक्षाने विरोध केला आहे. इंधन दरवाढी मुळे सामान्य जनतेला महागाई चा सामना करावा लागतो. सामान्य जनतेच्या व्यथा आपल्याला चांगली माहीत असून जनभावनेचा आपण नेहमीच आदर राखला आहे. 

इंधन दरवाढ हा गंभीर विषय आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना इंधन दरवाढ कमी करण्याबाबत सूचना केल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाने हे इंधन दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. इंधन दरवाढ प्रश्नांवर मी केलेले वक्तव्य कुणाच्या भावना दुखविणारे ठरले असल्यास त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे आठवले यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे.  

संबंधित लेख