ramdas athawale press in mumbai | Sarkarnama

एक मंत्रिपद तीन कार्यकर्त्यांना वाटून देणार : रामदास आठवले 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पुणे : रिपब्लिकन पक्षाला राज्यात एक राज्यमंत्रीपद देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. सरकारच्या उरलेल्या दीड वर्षांच्या काळात रिपाइंला मिळणारे मंत्रिपद सहा सहा महिन्यांसाठी तीन कार्यकर्त्याना वाटून देण्यात येईल अशी माहिती  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिली 

सह्याद्री गेस्ट हाऊस मुंबई येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आठवले म्हणाले, "" रिपब्लिकन पक्षाला एकही विधानपरिषद सदस्यत्व मिळालेले नाही. त्यामुळे रिपाइंच्या कार्यकर्त्याला राज्यमंत्री पदाची शपथ दिल्यानंतर त्यास 6 महिन्यांच्या कालावधीत विधिमंडळाचे सदस्यत्व मिळणे आवश्‍यक आहे. ते न मिळाल्यास आपोआप राज्यमंत्रीपद त्यास सोडावे लागेल. त्यामुळे जरी विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य नसले तरी रिपाइंचा कार्यकर्ता 6 महिन्यांसाठी राज्यमंत्री होऊ शकतो त्यामुळे सहा महिन्यांचे राज्यमंत्रीपद प्रत्येक कार्यकर्त्याला देऊन दीड वर्षांच्या काळात तीन कार्यकर्त्यांना प्रत्येकी 6 महिन्यांसाठी राज्यमंत्रीपद देता येईल असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.'' 

ऍट्रोसिटी कायदा आता अधिक मजबूत केला असून राष्ट्रपतींकडे मंजुरी साठी विधेयक पाठविण्यात आले आहे. तसेच पदोन्नती मध्ये एससी एसटी साठी आरक्षणाचा कायदा संसदेच्या येत्या हिवाळी करण्यात येणार असल्याचे आठवले म्हणाले. 
 
संबंधित लेख