""मोदी जीने हरिवंश को दे दिया है मौका, लेकिन हरिप्रसाद को कॉंग्रेसने दे दिया हे धोखा.'' 

""मोदी जीने हरिवंश को दे दिया है मौका, लेकिन हरिप्रसाद को कॉंग्रेसने दे दिया हे धोखा.'' 

नवी दिल्ली : ""मोदी जीने हरिवंश को दे दिया है मौका, लेकिन हरिप्रसाद को कॉंग्रेसने दे दिया हे धोखा.'' अशी कविता मंत्री रामदास आठवले यांनी संसदेत सादर करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व सदस्य हास्यकल्लोळात बुडाले. निमित्त होते राज्यसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक. 

संसदेत गुरुवारी राज्यसभेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक होऊन संयुक्त जनता दलाचे उमेदवार हरिवंश नारायण यांची निवड झाली. निवडणुकीनंतर सभागृहातील वातावरण रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या शुभेच्छापर कवितेने संपूर्ण सभागृहाचे वातावरणच बदलून गेले. 

आठवले यांनी हरिवंश यांना काव्यात्मक शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ""हरिवंश को आरपीआय के तरफ से देता हूँ शुभेच्छा, हाऊस को अच्छा चलाओ यही है इच्छा, हमेशा करता रहूंगा उनका पिछा, इसलिए दे रहा हू आपको शुभेच्छा.'' पंतप्रधान मोदी यांनी हरिवंश यांना दिलेली संधी व कॉंग्रेसचे पराजित उमेदवार हरिप्रसाद यांचे वर्णन करताना आठवले म्हणाले, ""मोदी जीने हरिवंश को दे दिया है मौका, लेकिन हरिप्रसाद को कॉंग्रेसने दे दिया हे धोखा.'' 

आठवलेंच्या या कोटीवर मोदी यांच्यासह सर्व सदस्यांनी हसून व बाके वाजवून आठवलेंना दिलखुलास दाद दिली. त्यानंतर आठवले यांनी आपली कविता पुढे सुरू ठेवली. ""इस चुनाव में दोनो ही थे हरि, हार गया प्रसाद हरि, चुनकर आ गया वंश हरि,''अशी टिप्पणी त्यांनी केली. 

हरिवंश यांना काव्यातून समर्थन देताना ते म्हणाले, ""आप चुनकर आ गए हैं, हमेशा चेअरमेन साहब से डरता हूँ, इसिलिए आपका समर्थन करता हूँ, दलित समाज और अपनी पार्टी की ओर से आपको बधाई देता हूँ.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com