Ramdas Athavle willing to fight from south Mumbai | Sarkarnama

दक्षिण मुंबईतुन रामदास आठवलेंना लढायचेय 

सरकारनामा
गुरुवार, 10 जानेवारी 2019

लोकसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर व ओवेसी यांच्या पक्षाची युती झाली तरी त्याचा फायदा भाजपलाच होईल.

-रामदास आठवले

मुंबई  :  " लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मुंबई मतदारसंघातून मला उमेदवारी मिळावी, यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आहे. दक्षिण मुंबईत सर्व जाती-धर्माचे लोक मला ओळखतात. याचा मला फायदा होईल",अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी गुरुवारी दिली.

माझा पक्ष भाजपसोबतच असेल. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती न झाल्यास आम्ही भाजपकडे जादा जागा मागू  ,असेही त्यांनी सांगितले.

मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या वार्तालापादरम्यान ते बोलत होते. मराठा, दलित व सवर्णांमध्ये होणाऱ्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर मराठा व सवर्णांना आरक्षण मिळावे, यासाठी आम्ही केंद्र सरकारच्या मागे लागलो होतो. आता दोन्ही समाजांना आरक्षण मिळाले असल्याने मी समाधानी आहे, असे आठवले म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मुंबई मतदारसंघातून मला उमेदवारी मिळावी, यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आहे. दक्षिण मुंबईत सर्व जाती-धर्माचे लोक मला ओळखतात. याचा मला फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.
 

संबंधित लेख