ramdas-athavale-narayan-rane-devendra-fadanvis | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

सीएम आहेत भाजपचे खणखणीत नाणे ; नारायण राणेंचे काही तरी बाकी आहे देणे ! - आठवले

संपत देवगिरे : सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 मार्च 2018

राजकीय फटकेबाजी असो वा प्रश्‍नांची टोलवा टोलवी करण्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा हातखंडा आहे.  रामदास आठवले यांनी पत्रकारांशी वार्तालाप  करताना ​फडणवीस -राणे प्रकरणावर शीघ्रकाव्य केले .

नाशिक:  राजकीय फटकेबाजी असो वा प्रश्‍नांची टोलवा टोलवी करण्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा हातखंडा आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी काळाराम मंदिर सत्याग्रह स्मृतिदिनाच्या कार्यक्रमास हजेरी लावली. पत्रकारांशी वार्तालाप केला. त्यावेळी त्यांनी नारायण राणे यांचे मंत्रिपद आणि मुख्यमंत्र्यांचे गाणे या विषयावर आपल्या नेहेमीच्या शैलीत बॅटिंग केली . 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  गाणे म्हणाले याविषयी तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न आल्यावर  आठवले  यांनी आपण मुख्यमंत्र्यांच्या गाण्याबाबत अनभिज्ञ असल्याचे आधी दाखवले .  तेव्हा त्यांच्या जवळ बसलेल्या कार्यकर्त्यांनी  मुख्यमंत्र्यानी नदी स्वच्छतेसाठी गाणे म्हटले.असे सांगून तपशील पुरवला  .  त्यांनी ते शांतपणे ऐकले. त्यानंतर आठवले यांनी त्यांनी गाणे म्हटले? मी नाही ऐकले.असे सांगत फडणवीस राणे प्रकरणावर शीघ्रकाव्य केले . ते असे ,

"पण सीएम नी जरी म्हटले गाणे,
 तरी ते आहेत भाजपचे खणखणीत नाणे.
 नारायण राणेंचे काही तरी बाकी आहे देणे!'' 

 नारायण राणे यांच्या विषयावर बोलतांना दिर्घ पॉझ घेत त्यांनी इकडे तिकडे मान फिरवली. त्यावर कार्यकर्ते त्यांना राणेंची माहिती सांगु लागले. शिवसेनेविषयी इनपुट देत होते.

त्यानंतर आठवले म्हणाले, "कदाचित शिवसेनेच्या दबावामुळे राणे यांना मंत्री केले जात नसावे. शिवसेनेने पाठींबा काढला तरी सरकारकडे 15 आमदारांची कमतरता आहे. मात्र सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला दोन्ही कॉंग्रेस पाठींबा देऊ शकतात. तसे झाल्यास राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार पडु शकते. त्यामुळे राणे यांच्या विषयी रणनिती बदलत असावी. मला दिल्लीत करमत नाही. त्यामुळे राणे दिल्लीत आले तर त्यांना मंत्री करावे ही मागणी मी भाजपकडे करीन.''

  रामदास आठवले पत्रकारांच्या काही प्रश्‍नांवर उत्तर देताना अडखळले .  मग काही  प्रश्‍नांवर कार्यकर्त्यांनी त्यांना अधिकची माहिती देत'प्रॉम्प्टींग' केले.

संबंधित लेख