ramdas athavale | Sarkarnama

बडोले-आठवले राजीनामा द्या  डॉ. भालचंद्र मुणगेकर कडाडले 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 10 जून 2017

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राज्यातील सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले हे राज्यात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांसंदर्भात असंवेदनशील बनले आहेत. त्यांनी आपल्या मंत्रीपदांचा तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी कॉंग्रेसचे माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे. 

दलित पॅंथरच्या काळात राज्यातील कोणत्याही गावांमध्ये दलितांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात धावून जाणारे आठवले हे भाजपात गेल्यापासून असंवेदनशील बनले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील रूईखेड मायंबा गावात 2 जूनला दलित महिलेला विवस्त्र करून तिची धिंड काढली जाते, तिच्यावर अत्याचार केले, तरीही आठवले हे पिढीत कुटुंबांना भेटले नाहीत. ते मंत्रिपद मिळाल्यानंतर आपला भूतकाळ विसरले आहेत. त्यांनी आणि राजकुमार बडोले यांनीही मंत्रिपदाचा तत्काळ राजीनामा द्यायला हवा.

महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनीही आपली जबाबदारी ओळखली नसून त्यांनीही महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या या घटनेकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष रविंद्र दळवी यांनी आज पत्रकार परिषदेत केली. 

दरम्यान, डॉ. मुणगेकर यांनी सांगितले की देशात भाजपाचे मोदी सरकार सत्तेत आल्यापासून दलित, आदिवासी, शेतकरी, ख्रिश्‍चन, मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात दहशतीच्या वातारणाखाली जगत आहेत. 
 
संबंधित लेख