ramdas aathawle about winning seat | Sarkarnama

शिवसेना भाजपला 48 पैकी 45-46 जागा मिळणार!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

जर दोघे एकत्र आले नाही तर शिवसेनेचे जास्त नुकसान होईल.

सातारा: शिवसेना भाजपची युती लोकसभेला होईल. पण विधानसभेला होईल का हे सांगता येणार नाही, असे आरपीआयचे अध्यक्ष, केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

भाजप व शिवसेनेची युती होईल का, या प्रश्‍नावर ते म्हणाले, 2014 मध्ये भाजप, शिवसेनेसोबत रिपब्लिकन पक्षाची महायुती झाली होती. त्यावेळी आम्ही 48 पैकी 42 जागा आम्ही निवडुन आणल्या. मागील साडे चार वर्षात दोघांची ताकद वाढलेली आहे. अनेक ठिकाणी पालिका, महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती दोघांनी स्वतंत्र निवडणुक लढून मते मिळविली आहेत. आता दोघांची मते 2014 पेक्षा जास्त वाढलेली आहेत. त्यामुळे दोघे एकत्र आले तर 48 पैकी 45 ते 46 जागा सहज निवडुन येतील. दोन तीन जागा कॉंग्रेसच्या निवडून येतील. जर दोघे एकत्र आले नाही तर शिवसेनेचे जास्त नुकसान होईल. भाजप आणि रिपाई एकत्र राहून 30 ते 32 जागांवर जाईल.

देशात भाजप आता 282 जागांवर आहे. ती जवळजवळ तीनशेच्या पुढे जागा भाजपला मिळतील. तर एनडीएला चारशेच्या पुढे जागा मिळतील, हा आम्हाला विश्‍वास आहे. शिवसेनेचे उध्दव ठाकरे ही शांत असामी राजकारणी आहेत. महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करून बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या अनेकवर्षांची दोस्ती लक्षात घेता दोघांनी युती करणे कार्यकर्ते, शिवसेना आणि महाराष्ट्राच्या भल्याचे आहे, असे आठवले म्हणाले.

संबंधित लेख