Ramchandra Bhusare's Shednet completed | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राजस्थानात काँग्रेसच्या हातातून बहुमत निसटले
मध्य प्रदेशात काँग्रेस बहुमताच्या जवळ
भाजपनं छत्तीसगढ. राजस्थान गमावले
मध्यप्रदेशात काँग्रेसची आघाडी, राजस्थानात बहुमत
छत्तीसगडमध्ये रमणसिंहांचे राज्य खालसा; काँग्रेस आघाडीवर
मध्य प्रदेशमध्ये भाजप पुढे, भाजप - 108 कॉंग्रेस - 106
छत्तीसगढ विधानसभा - काँग्रेस 44 जागांवर आघाडीवर
मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत
हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी घेणार तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट

समाजातील दानशूरांच्या मदतीने भुसारेंचे शेडनेट पुर्ण

ब्रह्मदेव चट्टे
शनिवार, 15 एप्रिल 2017

सकाळ माध्यम समूह माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिल्यामुळे दोन वर्षापुर्वी पडलेले शेडनेट उभा राहिले. त्यामुळे मी मनापासून मला मदत केलेल्या प्रत्येकाचे व सकाळचे आभार मानते. सरकारने माझ्यावर गुन्हा नोंदवलेला असून तो कायम आहे. त्यामुळे सरकारलाही मी विनंती करतो की मला न्याय द्यावा.

– रामेश्वर भुसारे , पिडीत शेतकरी, घाटशेंद्रा ता. कन्नड जि. औरंगाबाद

मुंबई : मंत्रालयात न्याय मिळण्याऐवजी जबर मारहाण मिळालेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी रामेश्वर भुसारे यांना समाजातील दानशूर  लोकांनी मदतीची हात दिला आहे.

ई -सकाळमधून भूसारे यांनी मदत देण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. परिणामी समाजातील दानशूर  लोकांनी रामेश्वर भुसारे यांच्या खात्यावर 95 हजार रूपये जमा केले. तर पुणे स्थित  “तेज अँग्रो इंडिया” कंपनीने ई सकाळच्या आवाहनाला प्रतिसाद देत ना नफा ना तोटा तत्वावर भुसारे यांना शेटनेट उभारून दिले आहे.

सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातून भूसारे यांची सत्यपरिस्थीती जगासमोर मांडण्यात आली. त्यामुळे पिडीत शेतकरी रामेश्वर हरिभाऊ भुसारे यांच्याकडे मदतीचा ओघ सुरू झाला. भुसारेंना न्याय मिळावा म्हणून घाटशेंद्रा गावकऱ्यांनी पाडवा सण साजरा न करता काळा दिवस पाळत गावबंद आंदोलन केले होते. रामेश्वर भूसारे या अल्पभुधारक शेतकऱ्यांने आपल्या एक एकर शेतात जानेवारी 2015 मध्ये शेडनेट बसवण्यासाठी स्वताजवळेचे आणि मित्रांकडून 10 लाख रूपये खर्च केले. मात्र, 11 एप्रिल 2015 व 14 एप्रिल 2015 रोजी आलेल्या वादळी वारे व गारपीठीने त्यांचे शेडनेट पिकासहित जमीनदोस्त झाले. गारपीठीत उध्दवस्त झालेल्या शेडनेटला पुन्हा उभारण्यासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून रामेश्वर भुसारे दोन वर्षापासून सरकारकडे पाठपुरावा करत आहेत.

आपल्याला मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत मिळावी म्हणून गेल्या दोन वर्षापासून पाठ पुरावा करत होते. यासाठी रामेश्वर भुसारे मुख्यमंत्र्यांना भेटायला २३ मार्चला आले होते. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाकडून  त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे सर्व वस्तूस्थिती जाणीन घेत सकाळ माध्यम समूहातून बळीराजाला साथ द्या आवाहान करण्यात आले आहे. या आवाहानाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने भुसारे यांचे शेडनेट उभे राहिले असून बळीराजा भुसारेंचे स्वप्न साकारण्यास मदत झाली आहे.

 

संबंधित लेख