ramansingh looses chhatisgadh | Sarkarnama

छत्तीसगडमधील रमणसिंहांचे 15 वर्षांचे राज्य खालसा

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

रायपूर : छत्तीसगडमध्ये चेहरा नसतानाही काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर देत सुरवातीच्या कौलानुसार आघाडी घेतली आहे. सकाळी पावणे दहा पर्यंत काँग्रेसला 54 आणि भाजपला 30 जागांवर आघाडी मिळाली आहे.

छत्तीसगड विधानसभे दोन टप्प्यात शांततेने 71.93 टक्के मतदान झाले होते. 90 जागांसाठी मतदान झाले होते आणि बहुमतासाठी 46 जागा आवश्यक आहे. 

छत्तीसगडमध्ये रमणसिंह हे गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत आहेत. नक्षलवादाच्या समस्येमुळे छत्तीसगड कायम चर्चेत राहिले असून, बरोजगाराचीही मोठा मुद्दा आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार प्रचार केला होता.
रमणसिंह यांचे साम्राज्य हलवून टाकणे अवघड काम होते. अजित जोगी यांच्या स्वतंत्र पक्षामुळे काॅंग्रेसला फटका बसले, असे बोलण्यात येत होते. मात्र काॅंग्रेसने विजय मिळवून दाखवला. 2003 नंतर काॅंग्रेस या राज्यात सत्तेवर येणार आहे.

संबंधित लेख