ramansingh is bhishamcharya | Sarkarnama

मणसिंह यांची भीष्माचार्यांशी तुलना 

वृत्तसंस्था
रविवार, 12 ऑगस्ट 2018

रायपूर : छत्तीसगडचे पंचायत व ग्रामीण मंत्री अजय चंद्राकर यांनी मुख्यमंत्री रमणसिंह यांची तुलना महाभारतील भीष्माचार्यांशी केली.

तीन वेळा मुख्यमंत्री झालेल्या रमणसिंह यांना डॉक्‍टर साहेब यांना "इच्छामृत्यू'चे वरदान आहे. निवडणुकीत कधी हार पत्करायची व कधी विजय मिळवायचा, हे ठरविण्याचा अधिकार आहे, असे ते म्हणाले. 

छत्तीसगडमध्ये या वर्षअखेरीस विधानसभा निवडणूक आहे. सत्ताधारी भाजप व विरोधी कॉंग्रेस पक्ष त्यासाठी तयारीला लागले आहेत. यातच चंद्राकर यांच्या "भीष्मा'च्या वक्तव्यावर वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

"मुख्यमंत्री मनरेगा मजदूर टिफिन वितरण योजने'च्या उद्‌घाटनप्रसंगी त्यांनी काल मुख्यमंत्र्यांची तुलना भीष्माचार्यांशी केली. चंद्राकर म्हणाले, की डॉक्‍टर साहेब यांना "इच्छामृत्यू'चे वरदान आहे.

महाभारतात भीष्म पितामह यांचा पराभव करण्याची क्षमता कोणाचीच नव्हती. मरणाला कधी व कसे सामोरे जायचे हे त्यांना माहीत होते. भीष्माप्रमाणेच फक्त डॉक्‍टर साहेबांना (रमणसिंह) कधी हारणार व जिंकणार हे माहीत आहे. छत्तीसगडमधील गोरगरीबच आपली शक्ती आहे, हे ते जाणून आहेत.
 
कार्यक्रमात चंद्राकर यांनी छत्तीसगडच्या स्थानिक भाषेत उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""रमणसिंह यांना इच्छामृत्यूचे वरदान का आहे? कारण राज्याची सेवा करण्याची प्रतिज्ञा त्यांनी घेतली आहे. देशातील सर्वांत विकसित राज्य म्हणून छत्तीसगड नावारूपाला येत नाही तोपर्यंत ते निवडणूक कसे हारतील व त्यांना मरण कसे येईल, याचे गुपित ते उघड करणार नाहीत. राज्यातील जनतेचे आशीर्वाद त्यांना आहेत. ध्येय गाठेपर्यंत रमणसिंह पायउतार होणार नाही.'' 

 दरम्यान, भीष्मपितामह युद्धात कौरवांच्या बाजूने लढले होते. चंद्राकर यांनी रमणसिंह यांची तुलना भीष्मांशी केली. म्हणजेच भाजप कौरव सेनेचे आहेत, हे चंद्राकर यांनी मान्य केल्याबद्दल कॉंग्रेसचे नेते टी. एस. सिंहदेव यांनी त्यांचे आभार मानले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख