कर्जमाफीचे श्रेय भाजपचेच : राम शिंदे 

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे श्रेय भारतीय जनता पक्षाला आहे. हे पाहून भाजपचे सहकारी पक्ष व विरोधक तडफडत आहेत, अशी टीका पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली.
कर्जमाफीचे श्रेय भाजपचेच : राम शिंदे 

नगर : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे श्रेय भारतीय जनता पक्षाला आहे. हे पाहून भाजपचे सहकारी पक्ष व विरोधक तडफडत आहेत, अशी टीका पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली. 

दसऱ्यापर्यंत कर्जमाफी द्या, असे विरोधक म्हणत आहेत. आणि आम्ही महिना अखेरीला कर्जमाफी देणार आहोत. एकूण स्थिती सारखीच आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणारच आहे. मग विरोधक व मित्रपक्षही श्रेय घेण्यासाठी कशाला धडपड करीत आहेत, असे शिंदे म्हणाले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना व छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धेसंदर्भात माहिती देताना त्यांनी ही टीका केली. भाजपचे देशपातळीवरील व राज्यातील काम चांगले आहे. त्यामुळेच नगरपालिका व नगर पंचायत प्रमाणेच आगामी ग्रामपंचायत निवडणुकांत भाजपच विजयी होईल. सरपंच हा भाजपचाच असेल. त्यामुळे आगामी काळात भाजपची घोडदौड सुरूच राहणार आहे. कर्जमाफीचे अर्ज नोंदणीसाठी 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. जिल्ह्यात बुधवारपर्यंत (ता. 13) पाच लाख 38 हजार 33 शेतकऱ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. त्यातील दोन लाख 32 हजार 573 अर्ज अपलोड झाले आहे. जिल्ह्यात पाच लाख 38 हजार 838 शेतकरी कर्ज माफीस पात्र ठरतील अशी शक्‍यता आहे. दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतलेले एक लाख 52 हजार 694 तर दीड लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज घेतले. 43 हजार शेतकरी आहेत. नियमीत कर्जफेड करणाऱ्या तीन लाख 16 हजार 993 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 25 हजार रुपये मिळणार आहेत. या कर्ज माफीतून कोणी लाभार्थी वंचित राहणार नाही, याची राज्य शासन काळजी घेणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले. 

उड्डाणपुलाविषयी आणखी एक उड्डाण 
नगरचा बहुचर्चित उड्डाणपुल होण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून खलबते सुरू आहेत. मध्यंतर युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी या प्रश्‍नासाठी दिल्लीवारी केली. मंत्र्यांना भेटून आपणच हा प्रश्‍न मार्गी लावत असल्याचे जाहीर करून टाकले. आता पालमंत्री प्रा. राम शिंदे यांनीही या उड्डाणपुलाविषयी बुधवारी बैठक घेणार असल्याचे सांगितले. शहरातील प्रलंबित उड्डाणपूल व राज्य महामार्गांसंदर्भात केंद्रीय रस्ते व महामार्ग बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या बरोबर बुधवारी (ता. 20) बैठक होणार आहे. या बैठकीत उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात चर्चा होईल. हा प्रश्‍न लवकरच मार्गी लागेल, असे शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे पुलाविषयी आणखी एक आश्‍वासनाचे उड्डाण झाले. आता खरोखर पुलाचे काम कधी सुरू होणार असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com