ram shinde | Sarkarnama

ओबीसी खात्याची जबाबदारी राम शिंदे यांच्याकडे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 जून 2017

कॅबिनेट मंत्रिमंडळातील पंकजा मुंडे, पांडुरंग फुंडकर यांना या नव्या खात्याचा कार्यभाग दिला जाईल अशी शक्‍यता व्यक्त केली जात होती परंतु मुख्यमंत्री फडणवीस यांनी राम शिंदे यांच्याकडे महत्त्वाचे खाते दिल्याने त्यांचे राजकीय वजन वाढण्याची शक्‍यता आहे .

मुंबई : राज्य सरकारने नव्याने स्थापन केलेल्या ओबीसी खात्याचा स्वतंत्र कार्यभाग राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे यांच्याकडे सोपवून त्यांना बढती देण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अहिल्यादेवीच्या जयंतीचे औचित्य साधत राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. 
महाराष्ट्राच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे यांनी भाजप पक्ष वाढविण्यासाठी ओबीसी समाजाला पक्षाच्या झेंड्याखाली आणण्याचा प्रयत्न केला. त्यातून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची ओबीसीचे नेते अशी प्रतिमा निर्माण झाली होती. राज्याच्या राजकारणाची दिशा ठरविणारी ओबीसीची मते भविष्यात निर्णायक ठरणारी आहेत. 

संबंधित लेख