ram kadam social media | Sarkarnama

नेटकऱ्यांनी राम कदमांना धू धू धुतले 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

मुंबई ः "मुलगी पसंत असेल तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार' असे बेताल वक्तव्य केल्याचा आरोप असलेले भाजपचे आमदार राम कदम यांचा निषेध करणाऱ्या मुसळधार पोस्ट सोशल मीडियावर पडल्या आहेत. त्यांची प्रचंड खिल्ली उडवली जात असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सुटले नाहीत. 

"एका रामाने भाजपला लाज आणली तरी देव शांत कसा' अशा सवालांचे शरसंधान मुख्यमंत्र्यांवर होत आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमात कदम यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. कदम यांच्या राम नावाचा वापर करून थेट रामायणाशी संबंध जोडणाऱ्या अनेक मिश्‍किल पोस्ट फेसबुक, ट्‌विटर आणि व्हॉट्‌सऍपवर दिवसभर व्हायरल झाल्या. 

आसाराम, रामरहिम, रामपाल, राम कदम... योगायोग बघा, राम नावालासुद्धा केले बदनाम. हे राम... हा आसाराम आणि हा असा राम. रामायणामध्ये रावणाने सीतेला पळवून नेले होते, आता राम मुलींना पळवायची भाषा करतोय, कलियुग आणखी काय... अशा पोस्ट नेटवर झळकल्या आहेत. 

थेट मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची छायाचित्रे वापरून कदमांवर शेरेबाजी करण्याचे धाडस दाखवणारेही आहेत; मात्र याप्रकरणी भाजपच्या नेत्यांनी मात्र सोईस्कर मौन बाळगले आहे. कदम के कदम भाजपला कुठे नेणार, असा सवाल फडणवीस यांनाच विचारण्यात आला आहे.

लोकप्रिय मालिका "तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील जेठालालनेही कदम यांच्याकडे, मुझे बबिता पसंद है...अशी मागणी केल्याची पोस्ट आहे. मुंबई लोकलची नवी अनाउन्समेंट... पुढील स्टेशन घाटकोपर...महिला प्रवाशांनी सावध राहावे, ही पोस्टही स्थितीचे यथार्थ वर्णन करणारी आहे. कदम यांना दलिंदर, रावण, किडनॅपर अशा लाखोल्याही वाहण्यात आल्या आहेत. 

संबंधित लेख