ram kadam and sonali bendrey | Sarkarnama

राम कदम पुन्हा घसरले... सोनाली बेंद्रेला श्रद्धांजली; नंतर ट्विटर अकाउंट केले डिलीट

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

मुंबई : भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात केलेल्या बेताल वक्तव्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत असतानाच आज त्यांनी अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या निधनाबाबत श्रद्धांजली अर्पण करणारे ट्‌विट करण्याचा नवा प्रताप केला. यावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवताच कदम यांनी आपले ट्‌विटर अकाउंट बंद केले. 

मुली पळवण्याच्या विधानावरून राज्यभरात राम कदम यांच्याविरोधात आंदोलने सुरू आहेत. त्यात भर म्हणून त्यांनी अमेरिकेत उपचार घेत असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधनाबाबतचे ट्‌विट करीत श्रद्धांजली वाहिली. आपली चूक लक्षात येताच त्यांनी हे ट्‌विट लगेच डिलीट केले; मात्र त्यांच्या या प्रतापामुळे त्यांच्यावर समाज माध्यमातून चौफेर टीकेची झोड उठली होती. 

"हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री व एकेकाळी सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी व आपल्या अभिनयाने सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड. यांचे अमेरिकेत निधन झाले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली,' असे ट्‌विट राम कदम यांनी केले. यावर टीकेची झोड उठताच "गेल्या दोन दिवसांपासून सोनाली बेंद्रे यांच्याबाबतची अफवा पसरली होती. त्यांच्या स्वास्थ्यासाठी व प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो,' असे दुसरे ट्‌विट करत राम कदम यांनी नव्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आणि अकाउंट बंद केले. अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार घेत असून, त्या आपल्या आजाराबाबतची प्रत्येक माहिती समाज माध्यमावरून चाहत्यांना देत आहेत. 

संबंधित लेख