अमोल कोल्हे निवडून आले; राम गावडेंचे पद गेेले

अमोल कोल्हे निवडून आले; राम गावडेंचे पद गेेले

पिंपरी : शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख (शिरूर लोकसभा) राम गावडेंना पदमुक्त,तर जिल्हा परिषदेतील गटनेत्या आशा बुचकेंची हकालपट्टी केल्याने जिल्ह्यातील जुन्या एकनिष्ठ शिवसैनिकांत खळबळ उडाली आहे. काम करून व एकनिष्ठ राहूनही पदावरून दूर करण्यात आल्याने धक्का बसल्याची प्रतिक्रिया गावडे यांनी `सरकारनामा`ला दिली.

आढळराव यांना पराभव पचवता आला नसल्याने त्यांनी आपली हकालपट्टी केल्याची बोचरी आणि तिखट प्रतिक्रिया बुचके यांनी दिल्यानंतर गावडे यांनीही आपल्याविरोधातील कारवाई ही अन्याय असल्याचेच सूचित केले. विद्यार्थी दशेपासून गेली 30 वर्षे शिवसेनेत असलेल्या गावडेंना काल पदावरून हटविण्यात आले.

लोकसभेला शिरूरमध्ये पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या झालेल्या पराभवाबद्दल त्यांना व इतर चार तालुकाप्रमुखांना जबाबदार धरून ही त्यांना पदावरून दूर करण्यात आले आहे. त्यातही गावडे हे आढळरावांचे एकनिष्ठ सैनिक असूनही त्यांना दूर केल्याने त्याबद्दल शिवसेनेत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.तरीही पक्षप्रमुखांचा आदेश शिरसावंद्य मानून शिवसैनिक म्हणूनच कार्यरत राहणार असल्याचे गावडे यांनी सांगितले.

या कारवाईनंतर त्यांना फोन सतत वाजत असून जुने एकनिष्ठ शिवसैनिक त्यांची विचारणी करीत आहेत. पक्षाने मला खूप काही दिले असल्याने मी समाधानी आहे,असे गावडे  म्हणाले. फक्त मला बोलावून विश्वासात घ्यायला हवे होते. मला बोलावून सांगायला पाहिजे होते. एवढीच माझी माफक अपेक्षा होती,अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ``आढळरावांना तीनवेळा खासदार केले. दोनवेळा मी विधानसभेला इच्छूक असूनही पक्षादेश पाळून माघार घेतली. पक्षासाठी त्याग केला. अपमान सहन केला,असे ते खेदाने म्हणाले. मी माघार घेतल्यानेच विधानसभेला सुरेश गोरे यांची गतवेळी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात लॉटरी लागली,`` असे ते म्हणाले. दरम्यान,पक्षाने काहीतरी विचार करूनच हा बदलाचा निर्णय घेतला असेल, अशी प्रतिक्रिया आढळराव यांनी या कारवाईवर दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com