ram gavade targets amol kolhe | Sarkarnama

अमोल कोल्हे, तुमचे `हाॅटेल सयाजी`मधील कारनामे उघड करू का : राम गावडे यांचा सवाल

भरत पचंगे
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

पुणे : अमोल कोल्हे यांच्याकडे  पाच कोटींची संपत्ती असताना लोकवर्गणी गोळा करायला ते कशासाठी निघालेत, असा प्रश्न विचारत कोल्हे हे एकाही प्रश्नाचे उत्तरे देत नसल्याची टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी केली.

``तुम्ही माझ्या तीन प्रश्नांची उत्तरे द्या.  तुम्ही आढळरावांना दिलेल्या आव्हानावर बोलतोच शिवाय पिंपरी-चिंचवडमधील सयाजी हॉटेलमधील आपल्या कारनाम्यांबद्दलही मी बोलतो`` अशा शब्दांत गावडे यांनी आव्हान दिले.

पुणे : अमोल कोल्हे यांच्याकडे  पाच कोटींची संपत्ती असताना लोकवर्गणी गोळा करायला ते कशासाठी निघालेत, असा प्रश्न विचारत कोल्हे हे एकाही प्रश्नाचे उत्तरे देत नसल्याची टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी केली.

``तुम्ही माझ्या तीन प्रश्नांची उत्तरे द्या.  तुम्ही आढळरावांना दिलेल्या आव्हानावर बोलतोच शिवाय पिंपरी-चिंचवडमधील सयाजी हॉटेलमधील आपल्या कारनाम्यांबद्दलही मी बोलतो`` अशा शब्दांत गावडे यांनी आव्हान दिले.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे व राष्ट्रवादीचे शिरूरमधील उमेदवार अमोल कोल्हे यांच्यातील आव्हान-प्रतिआव्हानांची जुगलबंदी राम गावडे यांनी आठ दिवसांपूर्वी केलेल्या आव्हानांनंतर नुकतीच कुठे सुरू झाली. गेल्या आठ दिवसांत या विषयांवर काहीच न बोललेले कोल्हे यांना त्यांच्या संपत्ती व घराबद्दल शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी ट्रोल केल्यावर कोल्हे काल बोलले. हे बोलताना त्यांनी  खासदार शिवाजीराव आढळराव यांनाच आव्हान दिले.

यालाच अनुसरुन गावडे यांनी सांगितले की, कोल्हे यांना तीन वर्षांपूर्वी शिवसेनेचे संपर्कप्रमुख केल्यावर कोल्हेंनी केलेले श्यून्य काम पाहून त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय झाला होता. हे लक्षात आल्यावर लगेच त्यांनी राष्ट्रवादीचा संपर्क वाढविला. राष्ट्रवादीला तर शिरूरमध्ये उमेदवारच नसल्याने कोल्हेंनी आपली केवळ बोलण्यातील पात्रता दाखविली आणि राष्ट्रवादीनेही केवळ चेहरा पाहून त्यांना उमेदवारी दिली, असा टोला गावडे यांनी लगावला.

राष्ट्रवादीला गर्दी होईल, असा चेहराच मिळत नसल्याने त्यांच्या हातात कोल्हे लागले. मात्र पक्षातील अनेक ज्येष्ठांना डावलून कोल्हे तुम्हीच उमेदवारीला पात्र कसे? विमातळाचा सन २०१३ मधील अहवाल राष्ट्रवादीने का दडवून ठेवला आणि बैलगाडा शर्यती सन २००५ पासून प्रत्येक वेळी राष्ट्रवादीनेच का बंद केल्या या तीन प्रश्नांची कोल्हेंनी उत्तरे दिली नसल्याने गावडे यांनी पुन्हा एकदा कोल्हेंना आव्हान दिले आहे.

या तीन प्रश्नांची उत्तरे द्या. मग मीही तुमच्या घराच्या प्रश्नांबाबत आणि कोल्हेंच्या बाबतीतील महत्वपूर्ण गोष्टींबाबत गंभीर खुलासाही आपण करणार असल्याची माहिती गावडे यांनी दिली.  कोल्हेंना शिवसेनेने संपर्कप्रमुख केल्यावर त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील सयाजी हॉटेलात पद वाटप आणि उमेदवा-या देताना केलेले कारनामे सगळे माझ्याकडे आहेत. त्यांची इच्छा असेल तर ती मी कधी जाहीर करू, तेही त्यांनी आता सांगावे असेही गावडे यांनी सुचविले आहे.   

शिवसेनेत मोठं व्हायचं आणि राष्ट्रवादीला पटवायचं असला प्रकार कोल्हेंनेही आता सुरू केलाय. त्यामुळे शिवसेनेशी गद्दारी करुन राष्ट्रवादीची उमेदवारी घेणा-या कोल्हेंच्या गद्दारीबद्द्ल शिवसेना आणि आमचा सामान्य शिवसैनिक त्यांना माफी करणार नाही. हे त्यांनी ध्यानी घ्यावे असा, इशाराही गावडे यांनी या वेळी दिला. 

संबंधित लेख