ram gavade challenges mla gore through thakur | Sarkarnama

ठाकूर यांच्या नथीतून राम गावडेंचा आमदार गोरेंवर तीर

विलास काटे
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

आळंदी : आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी वातावरण तापू लागले आहे. नुकतेच राजगूरूनगरला पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सभेत ठाकरे यांच्या भाषणापेक्षा पंचायत समिती माजी सभापती रामदास ठाकूर यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाची चर्चा अधिक रंगली. त्यांच्या शक्तिप्रदर्शनाला जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी हातभार लावल्याने त्यातून अनेक अर्थ निघू लागले आहेत. 

राजगूरूनगर येथील पूल आणि हुतात्मा भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांच्या  स्मारकशिल्पाच्या उद्घटानाच्या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे खेडमधे आले होते. सभा सुरू होण्यापूर्वी सभेच्या ठिकाणी गर्दी तुरळक होती. ठाकरे सभेला येण्यापूर्वी विश्रामगृहात पत्रकारांशी वार्तालाप केला. तोपर्यंत सेनेच्या गोटात गर्दी कमी असल्याने चिंतेचे वातावरण होते.  खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे, गावडे यांनी गर्दी जमविण्यासाठी धावाधाव सुरू केली. त्यानंतर ठाकूर यांची एन्ट्री झाली आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. मोठ्या धुमधडाक्यात वाजतगाजत ठाकूर यांनी सभेच्या ठिकाणी केलेला प्रवेशाने सभेत जान आली.

जिल्हाप्रमुख राम गावडे यांनीही तेवढ्याच उत्साहात `या, या, रामदास ठाकूर, स्टेजवर या, असे निमंत्रण दिल्याने ठाकूर समर्थकांचा उत्साह वाढला. खरे तर गावडे आणि ठाकूर यांचे गाव शेजारीशेजारी. शेजारी पुढे जात असेल तर दुसऱ्याच्या मनात किंतू राहतो. मात्र गावडे यांनी ठाकूर यांना प्रतिसाद दिला आणि त्यांना स्टेजवर बोलावले.

गावडे यांच्या खेळिने आमदार गोरे यांच्यासाठी चिंतेची बाब ठरली. ठाकूरांच्या नथीतून राम गावडे यांनी आमदार गोरे यांच्या उमदेवारीवर तीर मारल्याची चर्चा त्यानंतर रंगली. सभेला ठाकूर समर्थकांची गर्दी हा देखील नंतर चर्चेचा विषय राहिला. शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यात आमदार गोरे सध्या निश्चिंत असले तरी ठाकूर हे स्पर्धेत उतरल्याने रंगत वाढली आहे, हे निश्चित. 

संबंधित लेख