rakhi pornima vishesh | Sarkarnama

अडचणींच्यावेळी मोठ्या भावाचीच आठवण येते 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 26 ऑगस्ट 2018

नागपूर : अगदी लहानपणापासून माझा मोठा भाऊ अनिल देशमुख माझ्या मदतीसाठी धावून येतो. अजूनही मला काही अडचण किंवा माझ्यावर संकट आले तर मोठा भाऊ असलेल्या अनिल देशमुखांचीच आठवण येते. ही आठवण त्यांच्या लहान भगिनी ज्योती ठोसरे यांनी सांगितली. 

आमच्या भावंडांचे शिक्षण नागपुरातच झाले. अनिल देशमुख माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठे आहेत. माझे घराणे पहिल्यापासून राजकारणाशी संबंधित आहे. त्यामुळे घरात राजकारणी लोकांचा नेहमीच राबता राहायचा. याप्रमाणे अनिल देशमुख राजकारणात आले. राजकारणी घर असूनही विनासायसपणे अनिल देशमुखांना काहीही मिळाले नाही.

1992 मध्ये त्यांनी पहिल्यांदा जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली. त्यानंतर नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व 1995 मध्ये काटोलमधून आमदार व त्यानंतर मंत्री झाले. जवळपास 20 वर्षे ते मंत्री राहिल्यानंतर भावा-बहिनीच्या नात्यात कोणताही बदल झाला नाही. 

मी लहान असल्याने अनिल देशमुखांचा माझ्यावर जास्त जीव होता. आम्ही चार बहिणी व अनिल हा एकच भाऊ. त्यामुळे आम्हा बहिणींसाठी अनिल जास्तच लाडका आहे. शिकत असल्यापासून अनिल देशमुख माझ्या मदतीला धावून यायचा. हे बंध माझ्या लग्नानंतर कायम राहिले.

माझे सासरकडे सर्वच जण प्रशासकीय सेवेत होते. त्यामुळे राजकारणाचा काहीही संबंध आला नाही. सरकारी सेवेमुळे बरेचसे आयुष्य नागपूरबाहेरच गेले आहे. परंतु भाऊबीज, राखी पौर्णिमेला भावाकडे माझी भेट ठरलेली असते. आयुष्यात अनेकदा कठीण व कटू प्रसंगही आले. एकदा माझा अपघात झाला होता. त्यावेळी जवळपास वर्षभर मला घरातच राहावे लागले होते.

त्या काळातच अनिल भाऊ प्रत्येकवेळी घरी यायचा व धीर द्यायचा. अडचणीच्यावेळी भावाचीच मला आठवण येते. आता आम्ही 50 पेक्षा जास्त पावसाळे पाहिले आहेत. तरीही भावाची माया मात्र आटली नाही. अजूनही अनिलभाऊ राखीपौर्णिमेला राखी बांधायला घरी येतोच. 

संबंधित लेख