शेतकऱ्यांचे प्रश्‍न हातात घेतले तरच विरोधकांसोबत काम करणार - राजू शेट्टी

शेतकऱ्यांचे प्रश्‍न हातात घेतले तरच विरोधकांसोबत काम करणार - राजू शेट्टी

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्‍न हाती घेतले तर आपण विरोधकांबरोबर राहू अन्यथा शेतकऱ्यांच्या संघटनांच्या माध्यमातून मोदींना विरोध करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे यांच्या प्रचारासाठी खासदार शेट्टी भंडारा येथे गेले. 

नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्यासाठी विरोधी पक्षाचे अनेक नेते एकत्र येत आहेत. यात कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पार्टीचे नेते खासदार मुलायम सिंग यादव, राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, ओडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा समावेश आहे. या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर मोदी सरकारला घेरण्याची रणनीती आखली पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न देशात अत्यंत बिकट होत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यांवरच मोदींना घेरण्याचे प्रयत्न झाले पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडून जर विरोधक एकत्र येत असतील आपण देशातील शेतकऱ्यांच्या शंभरावर संघटनांच्या मदतीने मोदी सरकारचा विरोध करू, असा इशारा खासदार शेट्टी यांनी दिला. 

खासदार शेट्टी यांनी एनडीएतून बाहेर पडून पुढील निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत यापूर्वी दिले आहेत. परंतु खासदार शेट्टींच्या या नव्या भूमिकेमुळे पुन्हा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्‍न सोडविण्यासाठी उभारण्यात आलेल्या मंचमध्ये माजी खासदार नाना पटोले सुद्धा त्यांच्या सोबत आहे. नाना पटोले यांच्या आग्रहावरून खासदार शेट्टी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचारासाठी भंडारा येथील शेतकऱ्यांच्या मेळाव्याला हजेरी लावली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com