raju shetty says i will support bjp or congress | Sarkarnama

 जो पक्ष शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करेल त्यांना "स्वाभिमानी' चा पाठिंबा : राजू शेट्टी 

रामेश्‍वर काकडे 
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

वर्धा : " जो पक्ष शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करून इतर मागण्या पूर्ण करेल त्यांना आम्ही पाठिंबा देऊ मग तो भाजप असेल किंवा कॉंग्रेस'' अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिली. 

हमी भावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन भाजप सरकारने दिले होते परंतु व्यापाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने व्यापाऱ्यांसमोर लोटांगण घातल्याची टीकाही त्यांनी केली. 

मोदी सरकारने सात-बारा कोरा करून शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याबाबत दिलेले आश्‍वासन पूर्ण केले नाही. या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. शेतकऱ्यांच्या पिकाला दीडपट हमीभाव द्यावा, अन्यथा पुढील महिन्यात देशभर आंदोलन उभे करण्याचा इशारा त्यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिला. 

स्वाभिमानीने दुधाच्या दरात वाढ देण्यास सरकारला भाग पाडल्याचे सांगून ते म्हणाले, "" भाजप सरकारला शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी पाठिंबा दिला होता. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास सरकार चालढकल करीत असल्याने आम्ही सरकारमधून बाहेर पडलो. भविष्यात भाजपसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना जाणार नाही, मात्र जो पक्ष शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करून इतर मागण्या पूर्ण करेल त्यांना आम्ही पाठिंबा देऊ मग तो भाजप असेल किंवा कॉंग्रेस'' 

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोफळे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, युवा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाध्यक्ष प्रा. भास्कर इथापे, नांदेडचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, पवन तिजारे आदी उपस्थित होते. 

संबंधित लेख