Raju Shetty - Sadabhau duel continues | Sarkarnama

शेट्टींचा तो इशारा मला नव्हे - सदाभाऊ खोतांचे  प्रतिआव्हान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

मी आंदोनलात शेवटपर्यंत रहाणार असेही ते म्हणाले. ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यात श्री. शेट्टी काहीही बोलले तर ते माझ्यावरच बोलले असा प्रसार होत आहे, त्यातून गैरसमज होतात अशीही पुष्टी त्यांनी जोडली.

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिलेला इशारा हा माझ्यासाठी नव्हे तर कार्यकर्त्यांसाठी असल्याचे सांगत कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीराजू शेट्टी यांना पुन्हा आव्हान दिले आहे . 

 

राजू शेट्टी यांच्या इशाऱ्याना  आपण फारसे महत्व देत नाही हेच सदाभाऊ खोत यांनी तो इशारा कार्यकर्त्यांसाठी होता असे म्हणत दाखवून दिले आहे .  श्री. खोत मंत्री झाल्यासापून या दोघांत फारसे सख्य दिसत नाही. संधी मिळेल तिथे श्री. शेट्टी यांनी सरकारबरोबरच श्री. खोत यांच्यावरही टीका केली आहे. तर सदाभाऊंनी देखील राजू शेट्टी यांना जाहीर प्रत्त्युत्तर दिलेले आहे . एके काळे परस्परांचे मित्र असलेले नेते आता प्रसार माध्यमातूनथ परस्परांशी संवाद साधताना दिसत असून या संवादाला आता सवाल जवाबचे स्वरूप येऊ लागले आहे . 

 

 सोलापूर  येथे श्री. शेट्टी यांनी श्री. खोत यांना आत्मक्‍लेश आंदोलनात पाव्हणे म्हणून सहभागी व्हायचे असेल तर येऊ नका, या शब्दात इशारा दिला होता. या पार्श्‍वभुमीवर श्री. खोत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 

गेल्या गुरूवारी (ता. 4) स्वाभिमानीच्यावतीने कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात उशीरा सहभागी झालेल्या श्री. खोत यांनी आपले मंत्रीपद हे कुणाची मेहरबानी नसल्याचे सांगून अप्रत्यक्षरित्या श्री. शेट्टी यांनाच लक्ष्य केले होते.

या मोर्चातच श्री. शेट्टी यांनी 22 मेपासून पुणे ते मुंबई आत्मक्‍लेश आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. श्री. खोत मंत्री झाल्यासापून या दोघांत फारसे सख्य दिसत नाही. संधी मिळेल तिथे श्री. शेट्टी यांनी सरकारबरोबरच श्री. खोत यांच्यावरही टीका केली आहे. 

सोलापूर येथे मंगळवारी  श्री. शेट्टी यांनी पुन्हा एकदा श्री. खोत यांच्यावर राग काढताना त्यांनी आत्मक्‍लेश आंदोलनात पाहुण्यासारखे सहभागी होऊ नये, त्यांनी या आंदोलनात शेवटपर्यंत शेतकरी नेता म्हणून सहभागी व्हावे असा इशारा दिला. त्यावर श्री. खोत यांनी प्रतिक्रिया देताना श्री. शेट्टी यांचा हा इशारा माझ्यासाठी नव्हे तर कार्यकर्त्यांसाठी होता असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मी आंदोनलात शेवटपर्यंत रहाणार असेही ते म्हणाले. ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यात श्री. शेट्टी काहीही बोलले तर ते माझ्यावरच बोलले असा प्रसार होत आहे, त्यातून गैरसमज होतात अशीही पुष्टी त्यांनी जोडली. एका कार्यक्रमासाठी ते कोल्हापुरात आले असता त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. अशा प्रकारे सदाभाऊ खोत राजू शेट्टी यांचा शब्द खाली पडू द्यायला तयार नसल्याचे  दिसते . एव्हडेच नव्हे तर संघटनेत आपले स्थान राजू शेट्टी यांच्या बरोबरीचे असल्याचेही ते वारंवार प्रतिआव्हान देऊन दाखवून देत आहेत . 

 

 

संबंधित लेख