raju shetty quit maratha adolan | Sarkarnama

मराठा आंदोलकांनी राजू शेट्टींना पिटाळले 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 29 जुलै 2018

कोल्हापूर : "" तुमची सहानभूती नको, बाहुबलीला जाता जाता मराठा मोर्चाला भेट देण्याचे नाटक कशाला करता;'' असे ठणकावत मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांना हातकणंगलेतून पळवून लावले. 

खासदार राजू शेट्टी हे बाहुबली येथे दर्शनासाठी जात असतानाच जाता जाता त्यांनी हातकणंगले येथे जाऊन मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांची भेट घेतली. खासदार शेट्टी हे आंदोलन स्थळी पोहोचताच मराठा समाजातील तरुणांच्या भावनांचा उद्रेक झाला. जाताजाता मराठा मोर्चा आंदोलन स्थळाकडे आल्याबद्दल कार्यकर्ते संतप्त झाले. 

याबाबत कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला. त्यामुळे वातावरण चांगलेच गंभीर झाले. शेट्टी यांनी मराठा मोर्चाच्या ठिकाणी न थांबता थेट बाहुबलीला जावे असे सुनावत त्यांना आंदोलनातुन पिटाळून लावले. या प्रकाराची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे इतर नेत्यांनीही या गोष्टीचा चांगलाच धसका घेतला आहे घेतला आहे. 

संबंधित लेख