raju shetty questions vikhe patil in nagar | Sarkarnama

विखे पाटील सांगा, मॅनेजमेंट कोट्यात सभासदांच्या मुलांना प्रवेश का नाही?

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा अधिकार व शेतमालाला दीडपट भाव मिळण्याचा अधिकार ही दोन विधेयके संसदेत पास करुन त्याचा कायदा करण्यासाठी दिल्लीमध्ये आंदोलन करणार आहे.

- राजू शेट्टी

नगर : "साखर कारखान्याच्या पैशातून शिक्षण संस्था उभ्या केल्या, मात्र शेतकऱ्यांना मालक न करता स्वतः चे खासगी ट्रस्ट उभे केले व हजारो कोटीचे मालक झाले. त्या संस्थामध्ये प्रवेश मात्र देणगी देणारांना दिला जातो. मॅनेजमेंट कोट्यात सभासदांच्या मुलांना प्रवेश का दिला जात नाही, याचा जाब विचारला पाहिजे' अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता टीका केली.

इंदोरी फाटा (ता. अकोले) येथे राज्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हा ऊस व दुध परिषदेत आज शेट्टी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत होते. या वेळी हंसराज वढगुले, रसिका ढगे, प्रकाश मालवणकर उपस्थित होते. 

शेट्टी म्हणाले, नगर जिल्ह्यात आशिया खंडातील पहिला साखर कारखाना आहे, मग तो आशियात सर्वात जास्त उसाला भाव देणारा कारखाना कधी होणार? कोल्हापूर जिल्ह्यात उसाला भाव देवपूजा करून मिळाला नाही. त्यासाठी दहा पंधरा वर्षे लढाई करावी लागली. तेथे शेतकऱ्यांना ज्ञानेश्वर बनवून या रेड्यांच्या पाठीवर थाप मारायला शिकविले. त्यामुळे हे रेडे बोलायला लागले. 

संबंधित लेख