Raju Shetty Nitish Kumar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

नितीश कुमारांविना शेतकऱ्यांचा लढा सुरू राहणार : राजू शेट्टी

सुचिता रहाटे
शनिवार, 29 जुलै 2017

नितीश कुमार यांना काय राजकारण करायचे आहे ते करू देत. आमचा शेतकऱ्यांसाठीचा लढा कधीच थांबणार नाही. मात्र  नितीश कुमार भले भाजपमध्ये गेले असतील. परंतु शेतकऱ्यांच्या लढ्यात सामील होण्यासाठी काहीच हरकत नाही. - राजू शेट्टी

मुंबई : भाजपसोबत घरोबा करून नव्याने सरकार स्थापन केल्यामुळे सरकार विरोधातील शेतकरी आंदोलनात नितीश कुमार सामील होणार का? याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सप्टेंबर महिन्यात नितीश कुमार महाराष्ट्रात येणार होते. मात्र "ते आले तर सोबत घेऊन जाऊ अन्यथा कोणासाठी ही शेतकऱ्यांचा लढा थांबणार नाही," अशी प्रतिक्रिया संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली आहे.

देशभरातील शेतकरी नेते एकत्र यावेत म्हणून दिल्लीत मेळाव्यासाठी पुढाकार घेणाऱ्या राजू शेट्टी यांनी भाजपविरहित सरकार चालविणाऱ्या 'जेडीयू' चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतीच भेट घेतली होती. या भेटीत नितीशकुमार यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रमध्ये येण्याचे कबूल केले होते.

बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी बोलताना म्हणाले "नितीश कुमार यांना काय राजकारण करायचे आहे ते करू देत. आमचा शेतकऱ्यांसाठीचा लढा कधीच थांबणार नाही. मात्र  नितीश कुमार भले भाजपमध्ये गेले असतील. परंतु शेतकऱ्यांच्या लढ्यात सामील होण्यासाठी काहीच हरकत नाही. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्द्ल सरकार विरोधात ते काय भूमिका घेत आहेत ते कळेलच."

संबंधित लेख