raju shetty meet ahamad patel in new delhi | Sarkarnama

संसदेवरील मोर्चाच्या पार्श्‍वभूमी अहमद पटेलांना राजू शेट्टी भेटले

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

पुणे : स्वाभिमानी संघटनेते नेते आणि खासदार राजू शेटटी यांनी आज दिल्लीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची भेट घेतली. 

पुणे : स्वाभिमानी संघटनेते नेते आणि खासदार राजू शेटटी यांनी आज दिल्लीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची भेट घेतली. 

दिल्लीत येत्या 30 नोव्हेंबर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे संसदेवर काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभुमीवर ही भेट होती. देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍न तसेच संसदेत सादर केलेले शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमुक्ती व दिडपट हमीभाव या दोन विधेयकाबाबत शेटटी यांनी चर्चा केली. तसेच या आंदोलनासाठी गुजरातमधील विविध शेतकरी संघटना येणार असून त्या शेतकऱ्यांच्या दिल्लीतील व्यवस्थेबाबत चर्चा केली व कॉंग्रेसला या आंदोलनात सहभागी होण्याची विनंतीही शेट्टी यांनी त्यांना केली आहे.

संबंधित लेख