raju shetty inteview, mumbai | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

शेती तोट्याची म्हणूनच  कर्जमाफीची मागणी : राजू शेट्टी 

ब्रह्मा चट्टे 
मंगळवार, 20 जून 2017

मुंबई : शेती तोट्याची आहे म्हणून कर्जमाफीची मागणी केली आहे. आम्ही सरसकट कर्जमुक्तीवर ठाम आहोत. सरकारला कर्जमाफी करायला लावूच असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. 

मुंबई : शेती तोट्याची आहे म्हणून कर्जमाफीची मागणी केली आहे. आम्ही सरसकट कर्जमुक्तीवर ठाम आहोत. सरकारला कर्जमाफी करायला लावूच असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. 

सरकारनामाशी बोलताना शेट्टी म्हणाले,"" सरकारने घेतलेल्या शासन निर्णयावरच आम्ही नापसंती व्यक्त केली आहे. चार चाकीबाबत आमचा आक्षेप आहे. सध्या जुन्या गाड्या काही हजारात मिळतात, पण त्या मॉडेलची प्रत्यक्ष किंमत जास्त असते. अल्पभूधारक शेतकऱ्यांची मुले वडापसाठी अशा गाड्या खरेदी करत असतात. त्यामुळे सुकाणू समितीत तो शासन निर्णय मागे घेण्याची आम्ही मागणी केली. नव्या शासन निर्णयातील अटी काय शिथिल केल्या ते वाचल्याशिवाय स्वागत करणार नाही. सरकारने रात्री नवा शासन आदेश काढला तर उद्या होणाऱ्या सामुदायिक शासन निर्णय (जीआर) जाळत निषेध व्यक्त करण्याच्या कार्यक्रमाबाबत निर्णय घेणार आहे.'' 

नवा जीआर हातात आल्यानंतर बोलणार असून सरकारच्या एक लाख रूपयाच्या कर्जमाफीची मर्यादा आम्हाला आम्हाला मान्य नाही. सुकाणू समिती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. 

राष्ट्रपती निवडणुकीवर भाष्य करताना शेट्टी म्हणाले, "" राष्ट्रपती निवडणुकीत उमेदवार निवडताना निकष काय लावले ते माहित नाही. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवताना एनडीएचा घटक पक्ष म्हणून आमच्याशी सरकारने चर्चा केली नाही. त्यामुळे पाठिंब्याबाबत आम्ही अजून निर्णय घेतलेला नाही.''  
 

संबंधित लेख