raju shetty helds disussion with prakash ambedkar | Sarkarnama

पवारांशी चर्चा झाल्यानंतर राजू शेट्टींचे आंबेडकरांशी हितगुज!

उमेश घोंगडे
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

पुणे : राज्यात आणि देशात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लोकभावना आहे. त्यामुळे लोकांना काय वाटते याचा विचार करून भाजपाविरोधकांची महाआघाडी राज्यात उभी राहावी, अशी भूमिका शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे मांडली.

या संदर्भात भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी खासदार शेट्टी यांनी आज पुण्यात भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे एक तास बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी रविकांत तुपकर व हरिदास बधे उपस्थित होते.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीने शेतकरी संघटना तसेच वंचित बहुजन आघाडीच्या जागावाटपात सन्मानजनक तोडगा काढला नाही तर काय करायचे यावरदेखील बैठकीत चर्चा झाली. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने दुर्लक्ष केले तर राज्यात आंबेडकर-शेट्टी व ओवेसी यांच्यासह अन्य समविचारी संघटनांना सोबत घेऊन माध्यमातून तिसऱ्या आघाडीचा मोठा पर्याय उभा राहू शकतो, असे याबाबत सूत्रांनी सांगितले.

आंबेडकर हे राष्ट्रवादी सोबत घेण्यास तयार नाहीत. त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली होती. दुसरीकडे शेट्टी आणि शरद पवार यांच्यात मनोमीलन झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या दोघांची दोन दिवसांपूर्वी भेटही झाली. हातकणंगले मतदारसंघातून शेट्टी यांच्या महाआघाडीतील उमेदवारीला पवार ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यानंतरही शेट्टी आणि आंबेडकर हे एकत्र आल्याने साहजिकच भुवया उंचावल्या.

गेल्या लोकसभा निवडणुकीआधी कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरोधात महाआघाडी स्थापन करण्यात गोपीनाथ मुंडे यशस्वी ठरले होते. त्यामुळे मोठे यश मिळू शकले. तसाच प्रयोग सर्व भाजपाविरोधकांनी करायला हवा, अशी भूमिका खासदार शेट्टी यांनी मांडली. मात्र कॉंग्रेसकडून अजूनही पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही, अशी नाराजी या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

पाच राज्यांत होत असलेल्या निवडणुकांत भाजपाला फारसे यश मिळणार नाही, असा अंदाज यावेळी आंबेडकर व खासदार शेट्टी यांनी व्यक्त केला. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरदेखील बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे या सूत्रांनी सांगितले. 

सत्ताधारी भाजपाला तीव्र विरोध ही शेतकरी संघटनेची भूमिका आहे. मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाताना स्वत:चे महत्व कायम राहील, याची काळजी शेतकरी संघटनेच्यावतीने घेण्यात येत आहे.

संबंधित लेख