raju shetty have offer from bjp | Sarkarnama

सदाभाऊ मंत्री राहणारच; शेट्टींना मंत्रीपद देवू : चंद्रकांतदादा 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांची संघटनेतून हकालपट्टी केली असलीतरी त्यांना मंत्रीमंडळातून बाहेर केले जाणार आहे. शेट्टी एनडीएत राहणार असलीतर त्यांना आणखी एक मंत्रीपद दिले जाईल, असे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. 

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांची संघटनेतून हकालपट्टी केली असलीतरी त्यांना मंत्रीमंडळातून बाहेर केले जाणार नाही \. शेट्टी एनडीएत राहणार असलीतर त्यांना आणखी एक मंत्रीपद दिले जाईल, असे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. 

महसूल राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत खोत आणि संघटनेचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. खोत आता स्वाभिमानीचे प्रतिनिधी नाहीत, असे सांगत त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. तसेच एनडीएतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. 

यासंदर्भात बोलताना चंद्रकांतदादा पाटील यांनी खोत यांच्या हकालपट्टीची गरज नसल्याचे म्हटले आहे. खोत हे मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील आहेत आणि शेट्टी एनडीएत राहणार असतील तर त्यांना आणखी मंत्रीपद दिले जाईल, असे सांगून संभ्रमावस्था वाढवली आहे. आता राजू शेट्टी काय बोलतात, हे पाहावे लागणार आहे. 

संबंधित लेख