शेट्टींचा सत्कार सदाभाऊंच्या दारात 

दूध आंदोलन यशस्वी करुन परतलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेटटी यांच्या सत्काराचे नियोजन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. इस्लामपूर येथे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या शासकीय विश्रामगृहात आज शनिवारी सायंकाळी हा सत्कार होणार आहे.
शेट्टींचा सत्कार सदाभाऊंच्या दारात 

कोल्हापूर : दूध आंदोलन यशस्वी करुन परतलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेटटी यांच्या सत्काराचे नियोजन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. इस्लामपूर येथे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या शासकीय विश्रामगृहात आज शनिवारी सायंकाळी हा सत्कार होणार आहे. 

आंदोलनाच्या काळात रस्त्यावर ओतलेल्या दुधात पाणी किती असते, असे सांगत दूध आंदोलनाची मंत्री खोत यांनी खिल्ली उडवली होती. त्यांच्या या वक्‍तव्याचा कार्यकर्त्यांनी चांगला समाचार घेतला. या सर्व पार्श्‍वभूमीवर खासदार शेटटींच्या इस्लामपुरातील सत्काराला महत्व प्राप्त झाले आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून (ता.16) दूध दर आंदोलन पुकारले. हे आंदोलन दडपण्याचा मोठा प्रयत्न झाला. मात्र कार्यकर्त्यांनी मोठ्या नेटाने हे आंदोलन केले. या आंदोलनाची धार वाढत जाईल तशी सरकार आणि खासकरुन कृषीराज्यमंत्री सदाभाउ खोत यांची अस्वस्थता वाढली. बोलता बोलता खोत आंदोलनावर घसरले. रस्त्यावर आंदोलकांकडून ओतल्या जाणाऱ्या दुधात पाणी किती असते, याची आपणाला कल्पना असल्याचे वक्‍तव्य त्यांनी केले. 

राज्यात ठिकठिकाणी खोत यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला. आंदोलनाची तीव्रता पाहून सरकारलाच नमते घ्यावे लागले. संघटनेच्या मागण्या मान्य झाल्या आणि खासदार राजू शेटटींच्या शेतकरी नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्‍कामोर्तब झाले. आंदोलन यशस्वी झाल्याने खासदार शेटटी यांचा सर्वत्र सत्कार होत आहेत. मात्र खोत यांच्या विधानाने दुखावलेल्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक खा. शेटटी यांच्या सत्काराचे इस्लामपूर येथे आयोजन केले आहे. 

इस्लामपूर येथे असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या बाजुलाच मंत्री खोत यांचे निवासस्थान आहे. योगायोगाने खोत हे घरीच असून सायंकाळी खासदार शेटटी यांचा सत्कार होणार आहे. या सत्कारानिमित्त खासदार शेटटी हे मंत्री खोत यांच्यावर काय तोफ डागतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com