चुकीचे अंदाज देणाऱ्या हवामान खात्याला टाळे ठोका : राजू शेट्टी

चुकीचे अंदाज देणाऱ्या हवामान खात्याला टाळे ठोका : राजू शेट्टी

पुणे : देशातील हवामान खात्याच्या लहरीपणाचा फटका राज्यातील शेतकर्यांना बसला आहे. चांगल्या पावसाची अपेक्षा या खात्याने व्यक्त केली असताना प्रत्यक्षात शेतकऱ्यांना दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. त्याविरोधात खासदार राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली असून या खात्याला टाळे ठोकण्याची वेळ आल्याची टीका केली.

त्यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की यंदा मे व जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा पाच टक्के ज्यादा पाऊस होईल. तसेच महाराष्ट्रात देखील यंदा चांगला पाऊस होईल, असे भाकित हवामान खाते नियमित जुन ते सप्टेंबर दरम्यान करत आले. यांच्या अंदाजावर विश्वास ठेवत राज्यातील शेतकर्यांनी बियाणे व खतांची खरेदी केली व पेरण्या केल्या मात्र यंदा राज्यात सरसरीच्या २५% कमी पाऊस झाला असल्याने राज्यातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. मराठवाडा, विदर्भ , उत्तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी सरासरीच्या ४०% ते ७०% कमी पाऊस झालेला असल्याने भीषण स्थिती निर्माण झालेली आहे.

हवामान खात्याचे अंदाज बोगस ठरल्याने हे खाते नेमकी कोणाची दलाली करते, असा संशय निर्माण होत आहे. बियाणे व खतांच्या कंपन्यांचा धंदा व्हावा म्हणुनच यांनी बोगस अंदाज व्यक्त करीत शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. या विभागाचे अंदाज नियमित फोल ठरत असल्याने असला पांढरा हत्ती पोसण्या पेक्षा हा विभाग बंद केलेला योग्य अशी स्थिती निर्माण झाली आहे, असा सल्ला त्यांनी दिला. 

हवामान खात्याचे अंदाज इतके कसे फोल ठरले याची चौकशीची मागणी शेतकरी करीत असुन हवामान खात्याचा कारभार न सुधारल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे या विभागास टाळे ठोकले जाईल. मुहूर्ताची वाट न बघता राज्यात दुष्क़ाळ घोषित करण्याची मागणी केंद्र व राज्य सरकारकडे  स्वाभिमानी शेतकरी संघटना करत आहे. याबद्द्ल सरकारने त्वरीत निर्णय घ्यावा व शेतकरी व पशु धन वाचविण्यासाठी तात्काळ उपाययोजना सुरु कराव्यात, अशी मागणी प्रवक्ते योगेश पांडे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com