Raju Shetty criticizes Chandrakant Patil | Sarkarnama

गोपीनाथ मुंडे व मी बंद खोलीत खलबत करताना चंद्रकांत पाटील दारात उभे असत !

तानाजी जाधवर
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

वस्ताद कोणत्याही पैलवानाला सगळेच डाव शिकवित नाही, त्यामुळे मला कोण बाजुला गेल त्याची फिकीर नाही.

-राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याविषयी बोलताना श्री. राजु शेट्टी

उस्मानाबाद : "गोपीनाथ मुंडे व मी बंद खोलीत खलबत करत असताना त्यावेळी दरवाजात उभे असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना त्या गोष्टीची सल वाटत असे ,"अशी  तिखट प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार राजु शेट्टी यानी दिली आहे. उस्मानाबाद मध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

ऊस दर आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर महसुल मंत्री चंद्रकांत पाटील व राजु शेट्टी आमने सामने आल्याने त्या दोघांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगताना दिसत आहे.

राजु शेट्टी यानी चंद्रकांत पाटीलावर पुन्हा निशाना साधला आहे, " चंद्रकांत पाटील यांना एका गोष्टीची सल आहे. त्यांचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व आम्ही महाआघाडीची लोक चर्चा करत होतो तेव्हा अनेकवेळा चंद्रकांत पाटील हे दरवाजाबाहेर उभारलेले असायचे. महाआघाडीचा निर्णय झाला त्या बैठकीलाही चंद्रकांत पाटील कुठे होते ते त्यानाच विचारा ,"असाही थेट सवाल राजु शेट्टी यानी श्री. पाटील यांना विचारला आहे.

याशिवाय कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याविषयी बोलताना श्री. राजु शेट्टी म्हणाले की, "वस्ताद कोणत्याही पैलवानाला सगळेच डाव शिकवित नाही, त्यामुळे मला कोण बाजुला गेल त्याची फिकीर नाही. डाव शिकायला तेवढी बुध्दी असावी लागते," असा टोलाही शेट्टी यानी सदाभाऊ खोतांना लगावला. ऊस दर आंदोलन चिऱडुन टाकण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी सत्तेचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप श्री. शेट्टी यानी यावेळी केला.

संबंधित लेख