Raju Shetty attacks Government for FRP of Sugarcane | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातूनच आरक्षण : मुख्यमंत्री
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

सरकार शेतकरी आणि साखर कारखानदारांची  कुस्ती लावून मजा बघतय : राजू शेट्टी  

संपत मोरे   
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

ज्या कारखान्यांनी एफ आर पी दिलेली नाही त्या कारखान्यांना गाळपाचे परवाने देऊ नका असं न्यायालयानं सांगितलं असतानाही त्यांना गाळप परवाने दिले आहेत.

पुणे :  "सरकार शेतकरी आणि साखर कारखानदार यांची कुस्ती लावून मजा बघत बसलंय,या सरकारला शेतकऱ्यांसाठी काहीही करायचं नाही, "अशा शब्दात खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली. 

"ज्या कारखान्यांनी एफ आर पी दिलेली नाही त्या कारखान्यांना गाळपाचे परवाने देऊ नका असं न्यायालयानं सांगितलं असतानाही त्यांना गाळप परवाने दिले आहेत.  त्या कारखान्याचा ऊस पोलीस संरक्षणात कारखान्याकडे निघालाय. त्यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर साखर कारखानदारांचे बगलबच्चे हल्ले करत आहेत,त्यावेळी पोलीस शेतकऱ्यांची बाजू घेत नाहीत उलट शेतकऱ्यांना धमकावत आहेत. शेतकरी आणि कारखानदार यांच्या कुस्त्या लावून सरकार प्रेक्षकाची  भूमिका बजावत आहे."असं शेट्टी म्हणाले. 

"शेतकऱ्यांना दर मिळावा म्हणून मुख्यमंत्री तिजोरी रिकामी करू असं म्हणाले होते मग आता काय झालं ? करा ना तिजोरी रिकामी, "असं आवाहन शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं. सरकारने कुस्त्या लावण्यपेक्षा तोडगा काढावा असं शेट्टी म्हणाले. 
 

संबंधित लेख