raju shetty appeal congress not cheating | Sarkarnama

राजू शेट्टी करणार प्रकाश आंबेडकरांची मनधरणी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

मुंबई : सत्ताधारी भाजपला केंद्रातून आणि राज्यातून खाली खेचण्यासाठी तयार होणाऱ्या महाआघाडीत सामील होण्यासाठी "भारिप'चे प्रकाश आंबेडकर यांची मनधरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी करणार आहेत. 

राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांची आघाडी होणार आहे. यामध्ये राज्यातील इतर पक्षांना सामील करून त्याची महाआघाडी करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काही अटीवर या आघाडीत सामील व्हायचे जवळपास निश्‍चित केले आहे. 

राजू शेट्टी यांनी राज्यातील छोट्या घटक पक्षांना आघाडीत सामील होण्याचे आवाहन केले आहे. याचाच एक भाग म्हणून ते भारिपचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी संवाद साधणार आहेत. आंबेडकर यांनी यापूर्वीच "एमआयएम'चे असदुद्दीन आवेसी यांच्याशी संधान बांधले आहे. त्यामुळे आंबेडकर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीपासून दूर राहण्याची शक्‍यता लक्षात घेऊन त्यांचे मन वळवण्यासाठी खासदार शेट्टी प्रयत्न करणार आहेत. 

शेतकरी, वंचित, दुर्बल घटक, दलित, अल्पसंख्याक आदी सर्वच पातळीवर अपयशी ठरलेल्या केंद्रातील आणि राज्यातील सरकारला हटवण्यासाठी मी सर्वच पक्षांशी बोलणार आहे. लोकभारतीचे आमदार कपील पाटील, आमदार जोगेंद्र कवाडे यांच्याशी माझ्या बैठका झाल्या आहेत. त्याचप्रमाणे मी प्रकाश आंबेडकर यांच्याशीदेखील संपर्क करून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करणार आहे असेही राजू शेट्टी यांनी शेवटी सांगितले. 

संबंधित लेख